सचिन-शास्त्री फ्लॉप झाल्यावर 'या' खेळाडूने वाचवली भारताची लाज, 9 तास क्रीजवर...
Sanjay Manjrekar Birthday : जेव्हा भारतीय संघाला सर्वाधिक धावसंख्याची गरज होती आणि सचिन-शास्त्री फ्लॉप झाले होते तेव्हा हा बॅट्समॅन ट्रबलशूटर म्हणून आला होता. त्याने 9 तास सतत बॅटिंग करून टीम इंडियाला...
1/7
2/7
3/7
4/7
खरं तर, 1987 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 4 शतकं झळकावलीय. त्यापैकी एक शतक खूप खास ठरलं होतं. ज्याची आजही खूप चर्चाही होते. 18 ऑक्टोबर 1992 मधील ही कसोटी सामन्यातील हे शतक आजही सगळ्यांना आठवते. झिम्बाब्वेने पहिल्या डावात 456 धावा केल्या होत्या. यानंतर मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरत होते.
5/7
रवी शास्त्री 11 धावांवर तर सचिन तेंडुलकरने तर खातेही उघडलं नाही. मग कर्णधार अझरुद्दीनने 9 धावांवर मैदान सोडून गेला. टीम इंडियाने 101 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. आता टीम इंडियाचा पराभव निश्चित असं जवळपास निश्चित झालं होतं. पण अशात मैदानात संजय मांजरेकर आले आणि त्यांनी 9 तास बॅटिंग करुन भारतीय संघाची धावसंख्या 300 वर आणली. एवढंच नाही तर भारताला पराभवापासून वाचवलं. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला ती गोष्ट वेगळी.
6/7
संजय मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं वडील विजय मांजरेकर हे देखील खूप प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संजय यांनी क्रिकेटमध्ये आपली क्षमता दाखवली. मात्र ते भारतासाठी बरेच सामने खेळू शकलं नाहीत आणि त्यांनी वयाच्या 32 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
7/7