ATM मधून पैसे काढताना 'या' लाइटवर ठेवा लक्ष, नाही तर अकाऊंट होईल खाली

ATM Transaction : ऑनलाइन ट्रान्झेक्शनमुळे सायबर क्राइमचा गुन्हा वाढू लागला आहे. फक्त ऑनलाइन नाही तर एटीएमनं पैसे काढणे देखील आता सुरक्षित राहिलेले नाही. एटीएमचा वापर करत पैसे काढण्याची पद्धत जितकी सोपी झाली आहे तितकंच क्राइमही वाढला आहे.   

Feb 11, 2023, 16:25 PM IST
1/6

safe ATM Transaction keep eye on the light of machine

एटीएममधून पैसे काढताना आपण थोडा सावधगिरी केली तर आपण सायबर क्राइमचे शिकार होण्यापासून वाचू शकतो. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी ज्या मशीनमधून आपण पैसे काढतो ती मशीन सेफ आहे का हे तपासून पाहा. एटीएममधून पैसे काढताना सगळ्यात मोठा धोका हा कार्ड क्लोनिंगमुळे होतो. तुमची संपूर्ण माहिती कशा प्रकारे चोरांपर्यंत पोहोचते ते जाणून घेऊया...

2/6

safe ATM Transaction keep eye on the light of machine

एटीएम मशीनमधील कार्ड स्लॉटमधून हॅकर्स कोणत्याही ग्राहकाचा डेटा चोरतात. ते एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये अशी मशीन लावतात की, जे तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती स्कॅन करते. यानंतर, ते ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस डिव्हाइसमधून डेटा चोरी करतात.  

3/6

safe ATM Transaction keep eye on the light of machine

तुमच्या एटीमची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हॅकरकडे पिन नंबर असणे गरजेचे आहे. हॅकर्स या पिन नंबरला कॅमेऱ्यातून देखील ट्रॅक करू शकतात. यातून सावध राहण्यासाठी तुम्ही जेव्हापण पिन नंबर टाइप करता तेव्हा दुसऱ्या हातानं तुम्ही पिन नंबर टाईप करताना झाकून घ्या. जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुमचा पिन दिसणार नाही. 

4/6

safe ATM Transaction keep eye on the light of machine

जेव्हा तुम्ही एटएममध्ये जाता तेव्हा मशीनच्या कार्ड स्लॉटवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल ती एटीएमच्या कार्ड स्लॉटशी कोणी छेडछाड केली आहे, तर त्याचा वापर करू नका. 

5/6

safe ATM Transaction keep eye on the light of machine

कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकत असताना तिथे एक लाईट पेटते त्यावर लक्ष ठेवा. जर एटीएममध्ये हिरव्या रंगाची लाईट पेटत असेल तर ते सुरक्षित आहे आणि जर लाल लाईट आली तर एटीएमचा वापर करू नका, कारण ते Safe नसण्याचा इशारा आहे. 

6/6

safe ATM Transaction keep eye on the light of machine

जर तुम्हाला वाटलं ती तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकले आहात तर लगेच पोलिसांशी संपर्क साधा.