Valentine’s Day 2023 Gift Ideas : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला 'द्या' हे स्पेशल गिफ्ट

Valentine’s Day 2023: फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. फेब्रुवारी महिना म्हटलं की अनेक तरुण-तरुणींना एकच गोष्ट सतावत असते ती म्हणजे व्हॅलेंटाइन डे आणि तो दिवस कसा साजरा करायचा? शिवाय आपल्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी छान गिफ्ट देऊन सरप्राइज देण्याचा विचार अनेकजण करतात. पण जसा जमाना बदलला तशी मुला-मुलींची आवडदेखील बदलली आहे. त्यामुळे बदलत्या जमान्यातील तरुणाईला देण्यासाठीची आणि त्यांना इंम्प्रेस करणारी काही गिफ्ट देण्याच्या टिप्स आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला इंम्प्रेस करु शकाल.  

Feb 11, 2023, 16:10 PM IST
1/7

मुलांना देण्याच्या भेटवस्तू

ट्रॅक सूट- तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला ट्रॅकसूट गिफ्ट म्हणून देऊ शकता. कारण मुलांना व्यायामापासून ते प्रवासापर्यंत आरामदायक कपडे घालायला आवडतात. त्यामुळे हे गिफ्ट त्यांच्या उपयोगात येईलच शिवाय तो ज्या ज्या वेळी तुम्ही दिलेलं ट्रॅक सूट घालेल तेव्हा नक्कीच तुमची आठवण काढेल यात शंका नाही. 

2/7

पॉवर बँक - मुलं अनेकदा नोकरीनिमित्त किंवा अभ्यासासाठी घराबाहेर राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही बॉयफ्रेंडला पॉवरबँक गिफ्ट करू शकता. या गिफ्टचा त्यांना पुरेपूर फायदा होईल.

3/7

घड्याळ – मुलांना घडाळ्यांची खूप आवड असते. सध्या बाजारात अनेक विविध प्रकारची अनेक घड्याळ उपलब्ध आहेत. त्यामध्ये डिजीटल किंवा अनॅलॉग घड्याळ तुम्ही जोडीदाराला भेट देऊ शकता. जे त्यांना नक्की आवडेल.

4/7

साईड बॅग - मुलं नेहमी ट्रेकसाठी किंवा पिकनिकसाठी बाहेर जंगलात गडांवर जात असतात. पण विसरभोळ्या स्वभावामुळे अनेकदा ते काही वस्तू गमवतात किंवा घरात विसरून ट्रेकला जातात. त्यामुळे त्यांना साईडबॅग गिफ्ट म्हणून देऊ शकता. जेणेकरून ते त्या बॅगमध्ये त्यांचा फोन, चार्जर, रुमाल, मास्क, व्हिजिटिंग कार्ड, असे महत्वाचं सामान ठेऊ शकतात.

5/7

मुलींना देण्याच्या भेटवस्तू –

चॉकलेट – मुलींना चॉकलेट्स खूप आवडतात, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यांच्यासाठी चॉकलेट बॉक्स घेऊन जाऊ शकता. मात्र, चॉकलेट्स खरेदी करताना चांगल्या दर्जाची घेऊन जा कारण चॉकलेट्सच्या चॉईसवरुन त्या तुम्हाला जज करु शकतात.

6/7

फॅशन ज्वेलरी – गिफ्ट असे असावे की ते थेट हृदयापर्यंत जाईल आणि प्रेयसीला भावेल तर ते गिफ्ट म्हणजे ज्वेलरी. मुलींना दागिने आवडणार नाही असं होऊच शकत नाही. प्रत्येकीला दागिन्यांची स्टाईल वेगळी वेगळी आवडत असली तरी दागिने सर्वांनाच आवडतात.

7/7

बॅग किंवा पर्स – कॉलेजला जाणाऱ्या मुली असो की ऑफीसला सर्वच मुली बॅग वापरतात. क्लासी आणि ट्रेंडी बॅग्ज तर प्रत्येक मुलीच्या अॅक्सेसरीजमधील एक अविभाज्य भाग बनला आहे.