Jiah Khan ची बहीणंच नव्हे, या अभिनेत्रींचेही Sajid Khan वर गंभीर आरोप

Jan 20, 2021, 14:35 PM IST
1/7

जिया खान

जिया खान

दिवगंत अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) सोबत देखील साजिद खानने  (Sajid Khan) घाणेरडे कृत्य केल्याचे तिच्या बहिणीचे म्हणणे आहे.जिया खानची बहीण करिश्माने बीबीसीच्या एका डॉक्युमेंट्रीत खळबळजनक आरोप केलेयत. साजिदने तिच्या बहिणीला टॉप आणि ब्रा उतरवण्यास सांगितल्याचे ती म्हणाली.   

2/7

मॉडल पॉला

मॉडल पॉला

मॉडल पॉला (Model Paula) ने देखील आपली भयावह कहाणी कथन केलीय. जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा साजिद खानने तिच्यासोबत घाणेरडी गोष्ट केली. साजिदने स्वत:समोर कपडे उतरवण्यास सांगितल्याचे मॉडल पॉला म्हणाली.

3/7

शर्लिन चोप्रा

शर्लिन चोप्रा

जिया खान प्रकरण बाहेर आल्यानंतर शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ने देखील साजिदवर गंभीर आरोप केले. साजिद खानने 2005 साली आपला प्रायव्हेट पार्ट बाहेर काढून त्याला फिल करण्यास सांगितल्याचे शर्लिन म्हणाली.

4/7

सलोनी चोपड़ा

सलोनी चोपड़ा

अभिनेत्री सलोनी चोप्रा (Saloni Chopra) ने देखील साजिद खान पर आरोप केले. साजिदने आपल्यासोबत घाणेरडे चाळे केल्याचा आरोप तिने केला.

5/7

रेचल व्हाइट

रेचल व्हाइट

अभिनेत्री रेचल व्हाइट (Rachel White) ने देखील साजिदवर गंभीर आरोप केलेयत. साजिद माझ्यासोबत अश्लिल गप्पा मारु लागला. सिनेमात काम मिळण्यासाठी कपडे उतरवावे लागतील असं साजिदने म्हटलं. ही सर्व घटना तिने ट्विटरवर कथन केलीय.  

6/7

करिश्मा उपाध्याय

करिश्मा उपाध्याय

#Metoo आंदोलनादरम्यान करिश्मा उपाध्याय  (Karishma Upadhyay) नावाच्या महिला पत्रकाराने देखील साजिदवर गंभीर आरोप केले. साजिदची मुलाखत घ्यायला गेले तेव्हा साजिद आपले लिंग बाहेर काढू लागला असा आरोप तिने केला.  

7/7

अहाना कुमरा

अहाना कुमरा

`द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर`, `लिप्सटिक अंडर माय बुर्का` आणि अनेक वेब सिरीजमध्ये काम केलेली अभिनेत्री अहाना कुमरा (Aahana Kumra) ने देखील साजिद खानवर गंभीर आरोप केलेयत. साजिदने तिला विचित्र प्रश्न विचारले. जर तुला शंभर कोटी रुपये मिळाले तर तू एका कुत्र्यासोबत सेक्स करशील का ? असं त्याने विचारल्याचं अहाना म्हणाली.