'सलमान खान माझ्या हिटलिस्टवर'; लॉरेन्स बिश्नोईचा NIA समोर मोठा खुलासा

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करडी नजर ठेवली असून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई NIA समोर अनेक मोठे खुलासे केलंय. 

| Oct 15, 2024, 11:16 AM IST
1/8

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर रविवारी बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँग म्हटलं की, 'सलमान खानशी संबंध असलेल्या व्यक्तीला आम्ही माफ करणार नाही.' दरम्यान त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली.   

2/8

 बाबा सिद्दीकींच्या हत्ये प्रकरणात हरियाणातील गुरनैल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांचा संबंध हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याचा दावा करण्यात आलाय. NIA समोर लॉरेन्स बिश्नोईचा कबुलीजबाब दिल्या. तर एनआयएच्या आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोई अनेक धक्कादायक आणि मोठे खुलासे केले आहेत. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी अनेक राज्यांमध्ये पसरली असून त्यांच्याकडे 700 हून अधिक शूटर्स असल्याचे एनआयएच्या आरोपपत्रात उघड झालंय.

3/8

खुलासा नंबर 1

या सगळ्या पहिला खुलासा म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या हिटलिस्टमध्ये असून 1998 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याची कबुली बिश्नोईने एनआयएसमोर दिलीय. बिश्नोई समाज काळ्या हरणाची पूजा करतात, म्हणूनच लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानला ठार मारायचं आहे.   

4/8

खुलासा क्रमांक 2

दुसरा खुलासा असा होता की, लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टेरर सिंडिकेटचा मोठ्या पद्धतीने सम्राज्य पसरवलंय. दाऊद इब्राहिमनं 90 च्या दशकात छोटे-मोठे गुन्हे करून आपले नेटवर्क तयार केलं होतं, त्याच पद्धतीनं लॉरेन्स बिश्नोईनेही आपलं नेटवर्क तयार केलं आहे. दाऊद इब्राहिमनं अंमली पदार्थांची तस्करी, टार्गेट किलिंग, खंडणी रॅकेटच्या माध्यमातून आपलं साम्राज्य उभं केलं आणि मग त्यानं डी कंपनी स्थापन केली आहे. 

5/8

खुलासा क्रमांक 3

लॉरेन्स बिश्नोईने एनआयएला खुलासा केला आहे की, 2021 मध्ये त्याने गोल्डी ब्रारच्या माध्यमातून अमेरिकेतून गोगी टोळीला 2 जणांना पिस्तुले दिली होती. तर बिश्नोई गँगमध्ये 700 शूटर्सपैकी 300 पंजाबशी संबंधित आहे, असं त्याने सांगितलं होतं. बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून प्रचार करतात. बिष्णोई गँगनं 2020-21 पर्यंत खंडणीतून कोट्यवधी रुपये कमावले असून तो पैसा हवालाद्वारे परदेशात पाठवायचा. 

6/8

खुलासा क्रमांक 4

बिश्नोईने उघड केले की विकास सिंह हा अयोध्या, उत्तर प्रदेशातील एक शक्तिशाली नेता बिश्नोई टोळीच्या गुंडांना आश्रय देतो. त्यासोबत बिश्नोईची गँग एकेकाळी फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. पण त्यानं जवळचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यासोबत हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या गँगशी हातमिळवणी करून मोठी गँग निर्माण केलीय. बिश्नोई गँग आता उत्तर भारत, पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडपर्यंत पसरलीय. 

7/8

खुलासा क्रमांक 5

मुसेवालाच्या हत्येसाठी लॉरेन्स हवालाद्वारे गोल्डी ब्रारला 50 लाख रुपये पाठवले होते. सोशल मीडिया आणि इतर विविध मार्गांनी तरुणांना गँगमध्ये भरती केलं जातं. ही गँग अमेरिका, अझरबैजान, पोर्तुगाल, यूएई आणि रशियामध्ये पसरली आहे. तरुणांना कॅनडा किंवा त्यांच्या आवडीच्या देशात पाठवण्याचं आमिष दाखवून त्यांना गँगमध्ये भरती केलं जातं. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा हा पंजाबमध्ये टार्गेट किलिंग आणि गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी बिश्नोई गँगच्या शूटर्सचा वापर करतो.

8/8

खुलासा क्रमांक 6

या संपूर्ण गँगचा रिपोर्ट थेट साबरमती कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला दिला जातो. या गँगची शस्त्रे मध्य प्रदेशातील माळवा, मेरठ, मुझफ्फरनगर, यूपीमधील अलीगढ आणि बिहारमधील मुंगेर, खगरिया येथून येतात. याशिवाय पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाब जिल्ह्यातूनही या गँगकडे शस्त्रे पोहोचतात. याशिवाय, या गँगला पाकिस्तान, अमेरिका, रशिया, कॅनडा आणि नेपाळमधूनही शस्त्रे मिळतात.