Samsungची जबरदस्त ऑफर! 7400 पेक्षा कमी रुपयांत मिळवा Galaxy F04

Samsung Galaxy F04 : दक्षिण कोरियाच्या सॅमसंग या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने भारतात त्यांची Galaxy F मालिका सादर केली आहे  

Jan 04, 2023, 13:55 PM IST
1/5

Samsung Galaxy F04

सॅमसंगने आपला सर्वात कमी बजेटमधला सर्वोत्तम स्मार्टफोन Samsung Galaxy F04 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे.

2/5

Flipkart

Flipkart वरुन पॉकेट फ्रेंडली किंमतीत पॉवरफुल फीचर्स असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येईल.

3/5

samsung F04

60Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले Samsung Galaxy F04मध्ये देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर या फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम (RAM) वाढवण्याची क्षमता असणार आहे.

4/5

samsung phone

या फोनमध्ये मागील बाजूस  2MP डेप्थ सेन्सर आणि LED फ्लॅशसह 13MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची बॅटरीची क्षमता 5000mAh आहे. 

5/5

samsung Flipkart

Flipkart वरून हा फोन तुम्हाला 7,499 रुपयांना मिळणार आहे. तर SBI कार्डने हा फोन खरेदी केल्यास यावर 1,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे.