'या' 5G स्मार्टफोनवर मिळतोय 14 हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या
मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी 5G ची सेवा नुकतीच देशभरात सुरु झाली आहे. जर तुम्ही 5G चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगचा 'हा' स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरु शकतील बेस्ट ऑप्शन.
1/5
Samsung Galaxy M33 5G Display
Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. स्क्रीनचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080x2400 असून, हा स्मार्टफोन गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह येतो. मिस्टिक ग्रीन आणि डीप ओशन ब्लू या दोन रंगांमध्ये या स्मार्टफोनला खरेदी केलं जाऊ शकतं. फोन लॉक-अनलॉक करण्यासाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
2/5
Samsung Galaxy M33 5G Performance
Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनमध्ये Exynos 1280 Octa Core 2.4GHz 5nm प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन दोन बेस व्हेरिएंटमध्ये यूजर्सना खरेदी करता येतो. त्यापैकी एका व्हेरियंटमध्ये 6GB RAM सोबतच 128GB इंटरनल स्टोरेज मिळतं. त्याच वेळी, दुसरं व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने अंतर्गत स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येतं.
3/5
Samsung Galaxy M33 5G Camera
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 5MP सेकंद आणि 2-2MP चे 2 इतर सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोरच्या बाजूला 8MP कॅमेरा आहे. डिव्हाइस ऑटो फोकस, डिजिटल झूम ऑक्स स्लो मोशन सारख्या कॅमेरा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
4/5
Samsung Galaxy M33 5G Battery
5/5