Samsung चं 'हे' डिवाइस तुम्हाला बनवणार स्मार्ट, आत्ताच खरेदी करा

Samsung Galaxy Watch 5 पुढील महिन्यात लॉन्च होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या Samsung Galaxy Watch 5 बद्दलची वैशिष्ट्ये सांगणार आहोत..

Jul 08, 2022, 22:04 PM IST

अॅपलनंतर सॅमसंगच्या S सीरीजचे स्मार्टवॉच लोकांना खूप आवडते आहे असं दिसतय. अशा परिस्थितीत लोक सॅमसंगच्या पुढच्या म्हणजेच 5 सीरिजच्या स्मार्टवॉचची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि कंपनी ऑगस्टमध्ये Samsung Galaxy Watch 5 series लाँच करू शकते, अशा चर्चा सुरु आहेत.

1/5

Samsung Galaxy watch 5 Will launch next month

लीक झालेल्या माहितीनुसार, या नवीन सीरीजमध्ये दोन मॉडेल्स लाँच होणार असल्याचं समोर आलं आहे. याबद्दल आता प्रसिद्ध लीकर इव्हान ब्लासने मॉडेलबद्दल आणखी काही तपशील लीक केले आहेत. या सीरीजचे डिझाईन, हायलाइट्स आणि कलरचे पर्यायही लीकमध्ये सांगण्यात आले आहेत, त्यामुळे या स्मार्टवॉचबद्दल लोकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

2/5

Samsung Galaxy watch 5 Design

मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy Watch 5 आणि Watch 5 Pro या सीरीजचे दोन मॉडेल सादर केले जातील.

3/5

Samsung Galaxy watch 5 Leaks

Samsung Galaxy Watch 5 Pro चे कोडनेम प्रोजेक्ट एक्स आहे आणि ते ब्लॅक किंवा ग्रे टायटॅनियम कलर पर्यायांमध्ये येईल. हे खरेदीदारांना एलटीई आणि ब्लूटूथ प्रकारांमध्ये निवड देईल. घड्याळाच्या डायलचा आकार 45 मिमी असू शकतो.

4/5

Samsung Galaxy watch 5 Features

याशिवाय, सीरीजमधील दुसऱ्या स्मार्टवॉचबद्दल बोलायचं झाल्यास, व्हॅनिला गॅलेक्सी वॉच 5 चे कोडनेम हार्ट आहे आणि ते गेल्या वर्षीच्या स्टँडर्ड वॉच 3 चं उत्तराधिकारी आहे. हे एलटीई आणि ब्लूटूथ व्हेरियंटमध्ये येईल. यामध्ये पांढऱ्या, काळा आणि निळ्या शेड्सचे कलर पर्याय उपलब्ध आहेत.

5/5

Samsung Galaxy watch will be Water Resistant

महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही सॅमसंग स्मार्टवॉच WearOS 3.5 वर बूट होतील आणि One UI Watch 4.5 वर आधारित असतील. दोघांना 5 एटीएम वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आणि फीचर जीपीएस सपोर्ट मिळेल. ऑगस्टमध्ये होणाऱ्या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये दोन्ही घड्याळे सादर केली जाऊ शकतात.