Sanjay Dutt: 90 च्या दशकात संजय दत्त का लावायचा कपाळावर टिळा? कारण आहे फारच रंजक

Sanjay Dutt Tilak Reason: प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हा 90 च्या दशकामध्ये अनेकदा कपाळावर टिळा लावलेल्या अवतारामध्ये दिसायचा. मात्र आता तो या लूकमध्ये दिसत नाही. मात्र करियरच्या मधल्या काळामध्ये अचानक संजय दत्त टिळा का लावू लागला होता? यामागील नेमकं कारण काय आहे? यावरच टाकलेली नजर..

| May 16, 2023, 13:33 PM IST
1/10

Sanjay Dutt Tilak Reason

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) हा त्याच्या 90 च्या दशकातील विनोदी भूमिकांबरोबरच नकारात्मक म्हणजेच खलनायकी भूमिकांसाठीही ओळखला जातो. अनेक नकारात्मक भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. 80 आणि 90 च्या दशकामध्ये तर तो आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होता. त्याने अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. (सर्व फोटो - संजय दत्तच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन साभार)

2/10

Sanjay Dutt Tilak Reason

प्रमुख अभिनेता म्हणूनही संजयने चांगली लोकप्रियता मिळवली. मात्र खासगी आयुष्यात तो अनेक वादांमध्ये अडकला. त्याच्याविरोधात बेकायदेशीरपणे हत्यार बाळगल्याप्रकरणी आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमबरोबर संबंध असल्याचे आरोप लावण्यात आले.

3/10

Sanjay Dutt Tilak Reason

90 च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये संजय दत्त अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकला. त्यावेळी संजय दत्तचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांनी त्याला एक सल्ला दिला. संजयची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या हेतूने त्यांनी हा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे याचा खरोखरच परिणाम झाला.

4/10

Sanjay Dutt Tilak Reason

संजय दत्तने 90 च्या दशकामध्ये आपल्या कपाळावर टिळा लावण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा संजय प्रसारमाध्यमांसमोर किंवा सार्वजनिक जिवनामध्ये आला तेव्हा त्याच्या कपाळावर लांबलचक टिळा दिसायचा. 

5/10

Sanjay Dutt Tilak Reason

1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये संजय दत्तला मुंबई पोलिसांनी याच कालावधीमध्ये अटक केली होती. अटकेनंतर आपली बाजू मांडताना संजय दत्तने पोलीस आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. आपल्या मुस्लीम कनेक्शनमुळे आपल्याला त्रास दिला जात आहे असंही संजय म्हणाला होता.

6/10

Sanjay Dutt Tilak Reason

संजय दत्तची आजी मुस्लीम होती. संजयची आई नरगिस दत्त यांची आई मुस्लीम होत्या. दाऊद इब्राहिमबरोबर संजय दत्तचं नाव जोडलं गेल्याने त्याला देशद्रोही म्हणून हिणव्यातही येऊ लागलं. 

7/10

Sanjay Dutt Tilak Reason

1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संजय दत्तला अगदी दहशतवादी वगैरेही म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळेच त्याच्या नातेवाईकांनाही या गोष्टींचा फार त्रास होऊ लागला.

8/10

Sanjay Dutt Tilak Reason

यावेळी संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आणि निकटवर्तीयांनी संजय दत्तची एक कट्टर हिंदू म्हणून प्रतिमा तयार होणं आवश्यक असल्याचं सूचवलं. यामधून संजय दत्तला टिळा लावण्याचा सल्ला सुनील दत्त यांनी दिला.

9/10

Sanjay Dutt Tilak Reason

संजय दत्तला जेव्हा पहिल्यांदा जामीन मिळाला तेव्हा तो तुरुंगातून बाहेर येताना त्याच्या माथ्यावर लाल टीळा आणि हातात लाल रंगाचा धागा बांधलेला होता.

10/10

Sanjay Dutt Tilak Reason

तुरुंगामध्ये संजय दत्त जेव्हा बाहेर पडला तेव्हा लोक त्याच्याकडे कट्टर हिंदूच्या नजरेनं पाहू लागले. यानंतर अनेकदा संजय दत्त कपाळावर टिळा लावलेल्या अवतारामध्ये दिसून आला.