'चांद्रयान २'ने टीपलेली पृथ्वीची छायाचित्रं पाहाच

Aug 04, 2019, 13:26 PM IST
1/5

'चांद्रयान २'ने टीपलेली पृथ्वीची छायाचित्रं पाहाच

'चांद्रयान २' ने दुसऱ्या कक्षेत पुढच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर काही दिवसांनीच इस्रोने पृथ्वीची काही लक्षवेधी छायाचित्र प्रसिद्ध केलेली आहेत. चांद्रयान २ने टीपलेली ही छाय़ाचित्र पाहताना पृथ्वी नेमकी दिसते तरी कशी याचा सहज अंदाज लावता येत आहे. (छाया सौजन्य- @isro/ ट्विटर)

2/5

'चांद्रयान २'ने टीपलेली पृथ्वीची छायाचित्रं पाहाच

'चांद्रयान २'ने LI4 या कॅमेऱ्याच्या साथीने ही छायाचित्र शनिवारी टीपल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच या यानाने चौथ्या कक्षेत प्रवेश केला. (छाया सौजन्य- @isro/ ट्विटर)

3/5

'चांद्रयान २'ने टीपलेली पृथ्वीची छायाचित्रं पाहाच

पुढे हे यान मंगळवारी म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी त्याच्या पुढच्या कक्षेत प्रवेश करेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ते पुढील प्रवास करणार असल्याचं कळत आहे. (छाया सौजन्य- @isro/ ट्विटर)  

4/5

'चांद्रयान २'ने टीपलेली पृथ्वीची छायाचित्रं पाहाच

मून लॅंडर आणि रोवरच्या मदतीने चंद्रावर आंतराळ यान पाठविण्याच्या योजनेला २२ जुलै रोजी प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही एम के ३ या प्रक्षेपकाने उड्डाणानंतर बरोबर १५ मिनिटांनी चांद्रयानाला त्याच्या नियोजित कक्षेत नेऊन सोडलं. त्याच्याच पुढच्या क्षणाला नियंत्रणकक्षातील सर्व शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटलं. (छाया सौजन्य- @isro/ ट्विटर)  

5/5

'चांद्रयान २'ने टीपलेली पृथ्वीची छायाचित्रं पाहाच

अवकाशात झेपावलेलं हे चांद्रयान सुमारे ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार आहे. ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान चांद्रयान चंद्रावर पोहोचेल, असा अंदाज आहे. (छाया सौजन्य- @isro/ ट्विटर)