ब्लू पिल, 15 कोटींसाठी भांडण अन् खुनाचा कट; Satish Kaushik मृत्यूप्रकरणात धक्कादायक दावे

Satish Kaushik Death : बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. दिल्लीतील त्यांच्या व्यावसायिक मित्राच्या पत्नीने माध्यमासमोर येत केलेल्या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Mar 12, 2023, 16:03 PM IST

Satish Kaushik Death : बॉलिवुड अभिनेता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. दिल्ली पोलिसही या प्रकरणात नवे कंगोरे तपासत आहेत. मात्र, आतापर्यंत पोलिसांच्या तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही. दुसरीकडे सतीश कौशिक ज्या फार्म हाऊसवर शेवटची पार्टी करताना दिसले होते, त्याबाबत अनेक मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत.

1/6

vikas malu wife

सतीश कौशिक यांच्या विकास मालूची पत्नी सान्वी यांनी आपल्याच पतीवर कौशिक यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. महिलेने या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

2/6

satish kaushik friend

विकास मालूची पत्नी सान्वी मालू यांनी सतीश कौशिक हे माझ्या पतीचे मित्र होते आणि ते अनेकदा भारतात आणि दुबईतही आमच्या घरी येत असे सांगितले.

3/6

satish kaushik 15 crores

तीन वर्षांपूर्वी विकास मालूने सतीश कौशिक यांच्याकडून गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये घेतले होते, जे त्यांनी परत केले नव्हते. याच पैशाच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद सुरू होता. गेल्या वर्षी 23 ऑगस्ट 2022 रोजी दुबईमध्ये पैशावरून त्यांच्यात भांडण झाले होते.

4/6

satish kaushik vikas malu

त्यावेळी सान्वी यांनी हे काय प्रकरण आहे असे विचारले होते. तेव्हा विकास मालूने कौशिक यांनी 15 कोटी दिले होते जे कोरोनात बुडाले, असे सांगितले.

5/6

satish kaushik money

हा मुलींच्या मागे वेडा आहे. एखाद्या दिवशी रशियन बोलवून त्याला ब्लू पिलचा ओव्हरडोज दिला तरीही तो मरेल. याचे पैसे कोण परत करणार आहे, असे विकास मालूने म्हटल्याचे सान्वीने सांगितले.

6/6

satish kaushik death threats

'सतीश कौशिकचा लवकरच बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर तो गप्प बसणार नाही," असेही विकासने म्हटल्याचे सान्वीने सांगितले आहे.