Women's Day निमित्त SBI चे महिलांना GIFT

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) घर विकत घेणाऱ्यांसाठी मोठी सूट दिली आहे. एसबीआयने महिलांसाठी गृह कर्जाचे व्याजदर आणखी कमी केले आहेत. या प्रस्तावाखाली महिलांना आता 5 बीपीएस (BPS) ची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. याशिवाय दागिने  खरेदीवरही (Jewellery Shopping) खास सवलत दिली आहे.

Mar 08, 2021, 16:03 PM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) घर विकत घेणाऱ्यांसाठी मोठी सूट दिली आहे. एसबीआयने महिलांसाठी गृह कर्जाचे व्याजदर आणखी कमी केले आहेत. या प्रस्तावाखाली महिलांना आता 5 बीपीएस (BPS) ची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. याशिवाय दागिने  खरेदीवरही (Jewellery Shopping) खास सवलत दिली आहे.

1/5

एसबीआय ने ट्विटरवर दिल्या शुभेच्छा

एसबीआय ने ट्विटरवर दिल्या शुभेच्छा

SBI ने ट्विटरवरुन महिलांना शुभेच्छा दिल्या. एसबीआयने त्यात लिहिले ' Happy Women's Day to all the incredible women! Shine on... Not just today but everyday'.

2/5

Jewellery वर डिस्काउंट

Jewellery वर डिस्काउंट

महिला दिना निमित्त SBI ने ज्वेलरी (Jewellery) खरेदीवर महिलांना डिस्काउंट दिले, कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers), पीसी ज्वेलर्स (PC Jewellers), तनिष्क (Tanishq) या ठिकाणी SBI च्या YONO ऍप वरून खरेदी केल्यास महिलांना 30टक्कांची सूट.

3/5

गृह कर्जावर स्पेशल ऑफर

गृह कर्जावर स्पेशल ऑफर

एसबीआयने खास ऑफरद्वारे महिलांसाठी गृह कर्जावरील व्याज दर कमी केला आहे. यामध्ये महिलांसाठी 5 बीपीएसची (BPS) अतिरिक्त कपात केली आहे. याचा अर्थ असा की आता महिलांना पुरुषांपेक्षा 0.05 टक्के स्वस्त कर्ज मिळेल.

4/5

एसबीआयचा रेकॅार्ड कायम

एसबीआयचा रेकॅार्ड कायम

अलीकडेच गृह कर्ज क्षेत्रात एसबीआयने मोठे यश मिळवले आहे. एकूण बाजारपेठेत 34 टक्के हिस्सा एसबीआयचा आहे. एसबीआयने आतापर्यंत एकूण 5 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. एसबीआयचे लक्ष्य 2024 पर्यंत ही आकडेवारी 7 लाख कोटीपर्यंत वाढवण्याचे आहे.

5/5

घरबसल्या घ्या ऑफरची माहिती

घरबसल्या घ्या ऑफरची माहिती

एसबीआई ने होम लोनसाठी वेगळा कस्टमर केयर नंबर दिला आहे. ज्यांना एसबीआईकडून होम लोन घ्यायचं आहे, ते 72089-33140 या मोबाइल नंबरवर कॅाल करुन घर बसल्या संपूर्ण माहिती घेऊ शकता.