पर्सनल लोन घ्यायचंय, पण कोणती बँक परवडेल? पाहा सर्व बँकाचे व्याजदर व EMI

अचानक पैशांची गरज पडल्यास बँकेकडून कर्ज घेणे हा पर्याय आहे. अशावेळी बँक पर्सनल लोन हा अशावेळी सोप्पा पर्याय आहे. जर तुम्ही देखील पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला बँकेच्या प्रोसेसिंग फीबाबतही माहिती असायला हवी. बँका सामान्यतः पर्सनल लोनवर व्याज जास्त घेतात. अनेकदा व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि तुम्ही कुठे नोकरी करतात यावर आधारित असतो. तर जाणून घेऊया कोणत्या बँका किती व्याजदर देतात.

| Jan 24, 2024, 17:01 PM IST

Personal Loan Calculator: अचानक पैशांची गरज पडल्यास बँकेकडून कर्ज घेणे हा पर्याय आहे. अशावेळी बँक पर्सनल लोन हा अशावेळी सोप्पा पर्याय आहे. जर तुम्ही देखील पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला बँकेच्या प्रोसेसिंग फीबाबतही माहिती असायला हवी. बँका सामान्यतः पर्सनल लोनवर व्याज जास्त घेतात. अनेकदा व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि तुम्ही कुठे नोकरी करतात यावर आधारित असतो. तर जाणून घेऊया कोणत्या बँका किती व्याजदर देतात.

 

1/8

आयसीआयसीआय बँक

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

देशातील दुसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) कडून पर्सनल लोनवर वर्षाला 10.65 टक्के ते 16 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. बँक प्रोसेसिंग फी म्हणून 2.50 टक्के टॅक्स द्यावा लागतो. 

2/8

एचडीएफसी बँक

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. बँकेकडून पर्सनल लोनवर 10.5 ते 24 टक्क्यांपर्यंत व्याज घेतले जाते. मात्र, बँकेकडून फिक्स प्रोसेसिंग फी 4,999 रुपये इतकी घेतली जाते. 

3/8

स्टेट बँक ऑफ इंडिया

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारांकडून 12.30 ते 14.30 टक्के व्याज घेते. सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून 11.30 ते 13.80 टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. डिफेन्स सेक्टर व नोकरीपेशासाठी 11.15 ते 12.65 टक्के वर्षाला व्याज घेतले जाते. 

4/8

बँक ऑफ बडोदा

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

बँक ऑफ बडोदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 12.40 ते 16.75 टक्क्यांपर्यंत व्याजदराने कर्ज देते. याव्यतिरिक्त प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना 15.15 ते 18.75 टक्के व्याजदराने कर्ज मिळते.   

5/8

पीएनबी बँक

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

पीएनबी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना क्रेडिट स्कोरच्या आधारे 13.75 ते 17.25 टक्के या हिशोबाने कर्ज देण्यात येते. सरकारी कर्मचाऱ्यांना 12.75 टक्के ते 15.25 टक्क्यांपर्यंत व्याजदराने कर्ज मिळते. 

6/8

कोटक महिंद्रा बँक

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर दरवर्षी किमान १०.९९ टक्के व्याज आकारते. तसंच, कर्जाची प्रोसेसिंग फी आणि टॅक्स जोडल्यानंतर ते सुमारे 3 टक्क्यांपर्यंत वाढते.

7/8

अॅक्सिस बँक

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

अॅक्सिस बँक पर्सनल लोनवर 10.65 टक्के ते 22 टक्के वार्षिक व्याजदर देते. इंडसइंड बँक  पर्सनल लोनसाठी वार्षिक 10.49 टक्के दराने कर्ज देते. 30 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर बँकेचे प्रक्रिया शुल्क 3 टक्के आहे.  

8/8

EMI किती भरावा लागणार?

sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi

जर तुम्ही पाच वर्षांसाठी कर्ज घेतले आणि व्याज दर 10.50 टक्के असेल तर तुम्हाला दरमहिना 2149 रुपये EMI भरावा लागेल. जर त्याच कालावधी आणि रकमेवर व्याजदर 12 टक्के असेल तर ईएमआय 2224 रुपये होईल. 15 टक्के व्याजावर EMI रुपये 2379 आहे. 17 टक्के व्याजाने EMI 2485 रुपये होते आणि 18 टक्के व्याजाने ते 2539 रुपये भरावा लागेल.