Air BNb वर भाड्याने घेता येईल शाहरुखचा बंगला; एका रात्रीचं रेंट फक्त...

बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचं मुंबईतील मन्नत हे घर बाहेरून पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच गर्दी करताना दिसतात. त्याविषयी सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याच्या लॉस एंजेलिसच्या आलीशान घराविषयी अनेकांना माहित नाही. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 

| Jun 23, 2024, 17:40 PM IST
1/7

शाहरुखचं हे आलीशान घर हॉलिवूडच्या वेवर्ली हिल्स येथे आहे. हा एक लग्झरी मॅन्शन आहे. ज्यात कोणीही थांबू शकतं. चला त्या विषयी सविस्तर जाणून घेऊया. 

2/7

शाहरुख खाननं त्याच्या या घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत Airbnb वर देखील काही फोटो असल्याचे सांगितले होते. शाहरुख खानचं LA मध्ये असलेलं हे घर कोणत्या पॅलेसपेक्षा कमी नाही. 

3/7

Architectural Digest च्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या LA च्या घरात एक रात्र राहण्यासाठी 1,96,891 रुपये खर्च करावे लागतील.

4/7

त्याच्या घरात एक खूप मोठा स्विमिंग पूल आहे. ज्याच्या आजुबाजूला अनेक लोकांना एकावेळी बसण्यासाठी सोफा आणि खुर्च्या देखील आहेत. हे कोणत्याही पार्टी किंवा फॅमिली गेट-टूगेदरसाठी योग्य आहे. 

5/7

शाहरुख खानच्या या घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत. इंटीरियर आणि व्हाइट फर्निचर असलेल्या या रूममध्ये किंग खान पूल टेबलवर पोज देताना दिसत आहे. 

6/7

या फोटोत शाहरुखचा पूल एरियाची दुसरी बाजू दिसते. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 

7/7

शाहरुख खानच्या लिव्हिंग एरियाची झलक पाहायला मिळते. या फोटोत शाहरुख खान मोठ्या सोफा सेटवर, सेंटर टेबलजवळ पोज देताना दिसतो.