Shah Rukh Khan: डिस्चार्ज मिळाल्यावर मुंबईत पोहोचला शाहरूख खान; का लपवावा लागला चेहरा?

Shah Rukh Khan Back To Mumbai: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान अहमदाबादच्या केडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबईत त्याच्या घरी परतला आहे. शाहरूखला काही दिवसांपूर्वी हीट स्ट्रोकचा त्रास झाला होता. 

| May 24, 2024, 08:56 AM IST
1/7

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शाहरूख मुंबईत परतला आहे. यावेळी त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

2/7

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अभिनेता मुंबईतील कलिना विमानतळावर आपल्या कुटुंबासह स्पॉट झाला आहे. 

3/7

किंग खानच्या घरी परतल्याने त्याचे चाहते खूप खूश आहेत. यावेळी चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

4/7

मुंबईच्या एअरपोर्टवर चाहत्यांना शाहरुख खानचा चेहरा पाहता आला नाही.

5/7

मुंबई विमानतळावर येताच शाहरूखचा चेहरा छत्रीच्या सहाय्याने लपवण्यात आला होता.

6/7

यावेळी शाहरूखची पत्नी गौरी खानही त्याच्यासोबत दिसली. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर शाहरूख त्याच्या घरी 'मन्नत'वर पोहोचले.

7/7

शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान आणि अबराम खान देखील यावेळी शाहरूखच्या सोबत होता.