Actors Survived Wives Earnings: बॉलिवूडचे 'हे' सुपरस्टार पत्नीच्या कमाईवर जगायचे? पाहा PHOTO

Actors Survived Wives Earnings: बॉलिवूड इंडस्ट्रीत (bollywood) अनेक अभिनेत्यांनी खुप स्ट्रगल करून आपले नाव बनवले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांची नावे आघाडीवर आहेत. 

Dec 09, 2022, 20:33 PM IST

 बॉलिवूड इंडस्ट्रीत (bollywood) अनेक अभिनेत्यांनी खुप स्ट्रगल करून आपले नाव बनवले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र हा स्ट्रगल करताना त्यांच्यामागे त्याच्या पत्नी खंबीर उभ्या होत्या. या त्यांच्या कठिण काळात पत्नीने स्वत: पैसै कमवून घर चालवले होते. त्यामुळेच त्यांचे त्यावेळेस निभावून गेले होते. हे अभिनेते कोण आहेत, हे जाणून घेऊयात.  

1/5

shahrukh khan

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (shahrukh khan) खुप मोठं नाव केले आहे. त्याची बॉलिवूड (bollywood) पूरतीच नव्हे तर जगभरात ओळख आहे. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी गौरीशी लग्न केले होते आणि ते स्थायिक झाले. जरी शाहरुख आज मोठ्या पडद्यावर राज्य करत असला तरी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने खुप स्ट्रगल केला आहे.  

2/5

shahrukh khan

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख (shahrukh khan) जेव्हा कामानिमित्त बाहेर होता, तेव्हा त्याची पत्नी गौरीने कुटुंबाची जबाबदारी उचलली होती. त्याचवेळी, शाहरुखने एका मुलाखतीत करण जोहरला सांगितले होते की, महामारीच्या काळात गौरी खान ही त्यांच्या घरातील एकमेव कमावती सदस्य होती.

3/5

Manish Paul

या लिस्टमध्ये कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट मनीष पॉलचाही (Manish Paul) समावेश आहे. आज जरी तो एक प्रसिद्ध चेहरा बनला असला तरी त्याच्या यशस्वी कारकिर्दीमागे त्याची पत्नी संयुक्ताचा मोठा हात आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे. लग्नानंतर एक वेळ अशी आली की मनीषकडे घराचे भाडे भरण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र त्यांच्या पत्नीने सर्व जबाबदारी उचलली होती.

4/5

archana puran singh

प्रसिद्ध जज अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) आणि परमीत सेठी हे देखील या लिस्टमध्ये येतात.अर्चना हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव आहे, परंतु तिचे पती परमीतचे करिअर तितकेसे यशस्वी नव्हते. त्यामुळे अर्चना पूरण सिंहच्या कमाईवर त्यांचे घर चालते असे बोलले जाते. मात्र, आता परमीत एक यशस्वी व्यावसायिक आहे.

5/5

ayushman khurana

या यादीत आयुष्मान खुरानाचेही (Ayushmann Khurrana) नाव आहे. आज त्याचे नाव बी-टाऊनच्या सर्वात तेजस्वी आणि महागड्या स्टार्समध्ये सामील आहे, परंतु तो त्याची पत्नी ताहिरा कश्यपला आपली ताकद मानतो. तथापि, अभिनेता होण्याआधी, आयुष्मानने आपले आयुष्य पूर्ण करण्यासाठी विविध नोकर्‍या केल्या. त्याचवेळी त्यांची पत्नी महाविद्यालयात शिक्षिका होती. अनेकवेळा आयुष्मानला पत्नीच्या कमाईवर अवलंबून राहावे लागले होते, अशी माहिती आहे.