Shani Mangal Yuti : 30 वर्षांनी 'हा' अशुभ योग, या 4 राशींवर शनी-मंगळची वक्रदृष्टी

Shadashtak Yoga : मंगळ गोचर आणि शनी - मंगळ युतीमुळे मोठा अशुभ योग आहे. त्यामुळे याचा काही राशींना त्रास सहन करावा लागणार आहे. आज 10 मे रोजी शनी मूळ राशीत कुंभ राशीत गोचर होणार आहे. तर, मंगळ त्याच्या दुर्बल राशीत कर्क राशीत प्रवेश करणारआहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या संयोगाने षडाष्टक योग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो.

May 10, 2023, 09:12 AM IST
1/5

अनेकांना मंगळ ग्रहाची भीती वाटत असते. कारण मंगळ हा क्रोध आणि हिंसेचा कारक आहे. शनी दुःखाचे,  द्रारिद्र्याचे कारण आहे. कुंडलीत जेव्हा जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या स्थानात येतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. हा योग चार राशींसाठी दोन महिने संकटे घेऊन येतात. हा संकटाचा काळ म्हणून ओळखला जाणार आहे. षडाष्टक योगामुळे लोकांना दु:ख, रोग, कर्ज, चिंता आणि क्लेश यांना सामोरे जावे लागेल. 

2/5

कर्क राशीच्या लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. षडाष्टक योगाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मालमत्तेच्या बाबतीत वाद होऊ शकतात. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

3/5

सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात षडाष्टक योगामुळे तणाव आणि समस्या येऊ शकतात. नोकरीच्या आणि कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. खर्चाचे प्रणातात वाढ होऊ शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

4/5

कुंभ राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.  षडाष्टक योग अडचणी निर्माण करु शकतो, अशी स्थिती आहे. कौटुंबीक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघात होण्याचा धोका आहे.

5/5

मंगळ गोचर आणि शनी - मंगळ युतीमुळे षडाष्टक योग आहे. त्यामुळे धनु राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होऊ शकते. मानसिक अस्वस्थता राहू शकते. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)