IPL 2023 : टीम इंडियाची नवी पिढी घडतेय... 'हे' सहा खेळाडू करतायत आयपीएलमध्ये धमाका

IPL 2023 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात नवनवे युवा खेळाडू (Young Players) चर्चेत असतात. आपल्या खेळाने ते आयपीएलमध्ये छाप उमटवतात. आयपीएलमधून अनेक खेळाडूंनी थेट टीम इंडियात (Team India) स्थान मिळवलंय. आता या हंगामातही असेच काही युवा खेळाडू सर्वांचं लक्ष वेधून घेतायत. इतकंच नाही तर टीम इंडियाचं भविष्य म्हणूनही या खेळाडूंकडे पाहिलं जातंय. हे सर्व खेळाडू सध्या आयपीएलमध्ये (IPL) आपापल्या संघांसाठी मॅचविनर ठरतायत. अगदी कमी वयात या खेळांडूंनी निवड समितीलाही (Selection Committee) आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. 

| May 09, 2023, 21:55 PM IST
1/6

यशस्वी जयस्वाल

राजस्थान रॉयल्सला प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करुन देणाऱ्या यशस्वी जयस्वालने या हंगात धुमाकूळ घातला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने 124 धावांची धुवाँधार खेळी केली. आयपीएलमधल्या 11 सामन्यात यशस्वीने 477 धावा केल्या आहेत. 

2/6

सुयश शर्मा

19 वर्षांचा सुयश शर्मा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतोय. सुयशने आपल्या फिरकीच्या जोरावर बड्या फलंदाजांची विकेट काढलीय. 8 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या. विशेष म्हणेज सुयश स्थानिक क्रिकेटही खेळलेला नाही.

3/6

जितेश शर्मा

पंजाब किंग्स संघाकडून खेळणाऱ्या जितेश शर्मानेही क्रिकेटचाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. जितेशने आयपीएलच्या या हंगामात 11 सामन्यात 260 धावा केल्या आहेत. येणाऱ्या काळात जितेश विकेटकिपिंगसाठी पर्याय ठरू शकतो. जितेशने 17 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 632 धावा केल्या आहेत. 

4/6

तुषार देशपांडे

महेंद्र सिंग धोणीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळण्याची संधी तुषार देशपांडेला मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. तुषारने 11 सामन्यात 19 विकेट घेत पर्पल कॅपच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तुषार देशपांडे मुंबई संघाकडून खेळतो. तुषारने 29 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 80 विकेट घेतल्या आहेत. 

5/6

तिलक वर्मा

आणखी एका अनकॅप्ड खेळाडूची आयपीएलमध्ये जोरदार चर्चा आहे. या खेळाडूचं नाव आहे तिलक वर्मा. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या तिलक वर्माने आपल्या खेळीने काही सामने एकहाती जिंकून दिले आहेत. या हंगामात तिलक वर्माने 9 सामन्यात 45.67 च्या स्ट्राईक रेटने 274 धावा केल्या आहेत. 

6/6

रिंकू सिंह

आयपीएलमध्ये युवा खेळाडूंच्या यादीप पहिलं नाव येत ते म्हणजे कोलकाना नाईट रायडर्सचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंह याचं. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यानंतर रिंकू सिंहचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. एकाच षटकात सलग पाच षटकार मारत रिंकू सिंहने गमावलेला सामना जिंकून दिला. रिंकूने या हंगामात 11 सामने खेळले असून तब्बल 326 धावा त्याच्या नावावर आहेत.