'लग्न बेकायदेशीर आणि असंवैधानिक...', सोनाक्षीनं दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला

Shatrughan Sinha on Sonakshi Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा हिने मुस्लिम अभिनेता जहीर इक्बालशी लग्न करणार ही बातमी आल्यानंतर वडील शत्रुघ्न सिन्हासह भाऊ लव - कुश नाराज असल्याच बोल जातंय. अशातच लग्नाच्या 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला असून त्यांनी मोठं विधान केलंय. 

Aug 13, 2024, 15:10 PM IST
1/7

7 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 23 जून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने लग्न केलंय. पण या लग्नाबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पहिलं कारण होतं हिंदू मुस्लीम लग्न. तर दुसरं या लग्नाची बातमी सर्वात पहिले समोर आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीने काही सांगितलं नाही, अशा मथळ्याचा बातम्या. त्यात भर म्हणजे लग्नाला भाऊ लव - कुश यांची अनुपस्थिती. अशात लग्नाच्या 51 दिवसांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला असून या प्रकरणावर मौन सोडलंय.   

2/7

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाआधी आणि नंतरही अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. कुणी म्हटलं की, अभिनेत्रीचे दोन्ही भाऊही या लग्नावर खूश नाहीत, तर कुणी म्हटलं की, अभिनेत्रीचे वडील शत्रुघ्न सिन्हा मुलीवर नाराज आहेत. काही लोकांनी तर लग्नालाच 'बेकायदेशीर' आणि 'गैरसंवैधानिक' घोषित केलं. 

3/7

IANS शी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी आणि झहीरच्या नात्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं की, 'हा लग्नाचा विषय आहे, दुसरं म्हणजे जर मुलांचे लग्न झालं असून ते बेकायदेशीर आणि असंवैधानिक नाही. हे त्यांनी स्वतःच्या इच्छेने आणि आमच्या आशीर्वादाने केलंय. त्यामुळे मला त्याचं कौतुक वाटतं.'

4/7

आपल्या मुलीच्या निवडीबद्दल अभिमान आणि आनंद व्यक्त करतानाते  पुढे म्हणाले की, 'मी माझ्या मुलीच्या पाठीशी उभा राहणार नाही तर कोण उभे राहणार, मी आणि माझी पत्नी पूनम सिन्हा तिच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र उभे राहिलो होतो. तो खूप आनंदाचा क्षण होता. आपल्या मुलांच्या समाधानावर आपले प्राथमिक लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.'

5/7

सोनाक्षी आणि झहीर 'मेड फॉर ईच अदर' असं वर्णन करत शत्रुघ्न म्हणाले की, 'पालक नेहमी त्यांच्या मुलांच्या आनंदासाठी उभे असतात आणि मला वाटते की आमची मुले आनंदी आहेत.'

6/7

7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने 23 जूनला मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सिव्हिल वेडिंग केलं. यानंतर त्यांनी शिल्पा शेट्टीच्या आलिशान रेस्टॉरंट बास्टियनमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं, ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

7/7

प्रोफेशनल करिअरबद्दल बोलायचं झालं तर 'काकुडा' या उत्तर प्रदेशातील एका शापित गावावर आधारित एक हॉरर-कॉमेडी आहे, ज्यामध्ये ती रितेश देशमुख आणि साकिब सलीमसोबत स्क्रीन शेअर केलीय. यानंतर सोनाक्षी 'निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस' मध्ये दिसलीय.