Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?

Shikhar Dhawan Net Worth : टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनने (Shikhar Dhawan Retire) निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटमधून त्याने निरोप घेतलाय. मात्र आयपीएलमधील निवृत्तीबद्दल त्याने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर त्याची कायम चर्चा होते. अशा शिखर धवनची संपत्ती किती आहे जाणून घेऊयात. 

Aug 24, 2024, 09:45 AM IST
1/9

इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वामध्ये किंग्स 11 पंजाबमधून खेळणारा शिखऱ कमाईच्या बाबतही तगडा आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर पत्नी आयशाला त्याने घटस्फोट दिलाय. 

2/9

शिखर धवनची एकून संपत्ती ही 96 कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि आयपीएल सोबतच्या करारातून ही संपत्ती मिळवलीय. 

3/9

तर धवन ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे 30 लाख रुपये कमावतो. तर शिखर रिलायन्स जिओ, नेरोलॅक पेंट्स, म्युच्युअल फंड सही है, ड्रीम 11, फिव्हर एफएम, एरियल सारख्या ब्रँडच्या जाहिरातींमधून तो पैसे कमावतो. 

4/9

बीसीसीआयचा एका वनडेसाठी तो 6 लाख आणि एका टी - 20 साठी 3 लाख रुपये मानधन घ्यायचा. 

5/9

धवन दिल्लीतील एका आलिशान डिझायनर घरात राहतो, ज्याची किंमत सुमारे रु. 6 कोटी असून भारतभर अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत.  

6/9

धवनच्या कारचं कलेक्शन उच्च दर्जाच्या लक्झरी कार आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज GL350 CDI (अंदाजे रु. 80 लाख) आणि एक ऑडी, BMW 6 GT, रेंज रोव्हर स्पोर्ट्स आहेत. 

7/9

आयकॉनिक हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉयपासून ते ॲड्रेनालाईन-पंपिंग सुझुकी हायाबुसापर्यंत, धवनचे बाइक कलेक्शन आहे. 

8/9

शिखर धवन इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी पाहिला मिळाली आहे. 2024 मध्ये आयपीएल फी तब्बल ₹ 825,000,000 इतकं मानधन घेतलं.

9/9

घटस्फोटानंतर आयशाला वेळोवेळी 13 कोटी रुपये दिले आहेत, त्याशिवाय दोन मुलींची शालेय फी, प्रवास, हॉटेल आदी इतर ऐषोआरामावरही कोट्वधी खर्च करत असतो. शिवाय ऑस्ट्रेलियातील घरही आयशा आणि मुलींच्या नावावर केलीय.