Shikhar Dhawan : "मी अपयशी झालो.. होय मीच जबाबदार", शिखर धवन असं का म्हणाला?

शिखर धवनचा आयेशा मुखर्जीसोबत 2021 साली घटस्फोट (Shikhar Dhawan failed marriage with Ayesha Mukherjee ) झाला. त्यानंतर शिखरने पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.

Mar 26, 2023, 15:51 PM IST

Shikhar Dhawan Ayesha Mukherjee : गेल्यावर्षी बांग्लादेश दौऱ्यानंतर शिखर धवनला (Shikhar Dhawan) भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. मात्र, आता शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जचं नेतृत्व करताना दिसणार आहे. शिखर धवनचा आयेशा मुखर्जीसोबत 2021 साली घटस्फोट झाला. त्यानंतर शिखरने पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. (Shikhar Dhawan opens up about his failed marriage with Ayesha Mukherjee says I failed yes mech is responsible latest sports news)

1/5

शिखर धवन इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या आगामी हंगामात पंजाब किंग्ज (PBKS) चे नेतृत्व करणार आहे. त्याआधी शिखर धवनने त्याच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

2/5

मी अपयशी झालो, कारण शेवटचा निर्णय स्वत:चा असतो. मला दुसऱ्यांवर बोट दाखवायला आवडत नाही. मी अपयशी ठरलो, कारण मला त्या क्षेत्राचा अंदाज नव्हता, असं शिखर धवन म्हणालाय.

3/5

माझे हे सर्व अनुभवाचे बोल आहेत. पहिल्यांदा 1-2 वर्ष एकत्र घालवा, नंतर दोघांचं संस्कार जुळतात का नाही हे पाहणं गरजेचं आहे, असंही शिखर म्हणतो.

4/5

गेली 26 व्या वर्ष क्रिकेट खेळत असताना मी कधीही प्रेम प्रकरणात पडलो नव्हतो. पण, जेव्हा प्रेमात पडलो, तेव्हा धोक्याची घंटा ओळखता आली नाही, अशी खंत देखील त्याने व्यक्त केलीये.

5/5

दरम्यान, सध्या प्रकरण न्यायालयात आहे. घटस्फोटाचा वाद संपल्यानंतर जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा तेव्हा मी अधिक समजूतदार झालो असेल, असंही शिखर म्हणतो.  'आज तक'शी बोलताना शिखरने यावर भाष्य केलंय.