PHOTOS: दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार, महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

Maharashtra State Weapon Dandpatta: दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. 

Feb 19, 2024, 16:51 PM IST

Maharashtra State Weapon: दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. 

1/7

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळ्यांनी अनेक लढायांमध्ये वापरलेल्या दांडपट्टा या शस्त्रास महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं जाणार आहे. 

2/7

आग्रा इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दांडपट्ट्याचा अध्यादेश सुपूर्द केला जाणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

3/7

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेत सोहळा आणि शिवजयंती साजरी केली जात आहे. याचं औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आल्याचं सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं.

4/7

दांडपट्टा हे शस्त्र महाराष्टातील जनेतच्या चिरंतन स्मृतीत राहावे हा उद्देश असल्याचंही सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं. प्राचीन काळात दांडपट्ट्याचा उल्लेख ‘पट्टीश’ असा केला जात होता.

5/7

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख असणाऱ्या शिवभारत, सभासद बखर आणि राज्यव्यवहार कोष, तसंच अनेक बखरी आणि ऐतिहासिक साहित्यात दांडपट्टा शस्त्राचा उल्लेख आढळतो. 

6/7

दांडपट्टा हे तलवारीच्या पात्यासारखं एक शस्त्र आहे. यात लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते आणि मुठीवर चढवता येणारे चिलखत जोडलेलं असतं. 

7/7

मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत दांडपट्टा या शस्त्राचा परिणामकारक वापर केल्याचा उल्लेख सापडतो. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.