PHOTO: गौतम गंभीर प्रशिक्षक बनताच 'या' पाच खेळाडूंना लागणार लॉटरी, टीम इंडियात होणार एन्ट्री

Gautam Gambhir Team India Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनली. त्यानंतर गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या चर्चांना वेग आला आहे.

| Jun 20, 2024, 18:25 PM IST
1/7

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची घोषणा बीसीसीआयकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने गंभीरची मुलाखत घेतली असून आता घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागताच टीम इंडियात पाच खेळाडूंना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. 

2/7

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 मध्ये ट्रॉफीवर नाव कोरलं. गौतम गंभीर या संघााचा मेंटोर होता. त्यामुळे गंभीर आणि अय्यरचं चांगलं बॉण्डिंग आहे. पण बीसीसीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने श्रेयस अय्यरला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढण्यात आलं. टी20 वर्ल्ड कपमध्येही अय्यरला जागा मिळाली नाही. गंभीर प्रशिक्षक झाल्यास अय्यरची टीम इंडियातली जागा निश्चित मानली जात आहे. 

3/7

दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे अगदी कमी कालावधीत त्याने टीम इंडियात आपली छाप उमटवली. पण यशस्वी जयस्वाल संघात आल्यानंतर तो काहीसा मागे पडला. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शुभमन गिलला 15 खेळाडूंमध्येही जागा मिळाली नाही. पण शुभमन गिल हा गौतम गंभीरचा फेव्हरेट खेळाडू आहे. त्यामुळे त्याचं नशीब उजळू शकतं.

4/7

गेल्या वर्षभरात या खेळाडूंने करोडो भारतीयांची मनं जिंकलीत. टीम इंडियात पदार्पण करताच युवा आक्रमक फलंदाज रिंकू सिंहने आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीरचा फोकस युवा खेळाडूंवर असणार आहे. त्यामुळे गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर रिंकू सिंगवर त्याचं विशेष लक्ष असणार आहे. 

5/7

आयपीएलच्या सतराव्या हंगामात काही मोजक्या खेळाडूंनी दमदार कामगिरी कामगिरी केली. त्यातलं पहिलं नाव म्हणजे अभिषेक शर्मा. सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेकने यंदाच्या आयपीएल हंगामात चौकार-षटकारांची बरसात केली. याचं बक्षीस म्हणून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अभिषेकला टीम इंडियात जागा मिळण्याची शक्यता आहे.

6/7

गौतम गंभीरची टॉप लिस्टवर आणखी एक खेळाडू आहे तो म्हणजे बेस्ट फिनिशर म्हणून आयपीएल 2024 मध्ये चमकलेला रियान पराग. यंदाच्या आयपीएल हंगामात रियान परागने तुफान खेळी केली. लवकरच टीम इंडियात त्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

7/7

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी गौतम गंभीरने काही अटी ठेवल्या होत्या. या सर्व अटी बीसीसीआयने मान्य केल्याची माहिती आहे. यातली सर्वात मोठी अट म्हणजे गंभीरला एकदिवसीय आणि टी20 सामन्यांसाठी वेगवेगळा संघ करायचा आहे. असं झालं तर सध्या संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.