T20 WC 2024: धक्कादायक! वर्ल्डकपसाठी टीम इंडियासोबत विराट अमेरिकेला गेला नाही; 'हे' आहे कारण

T20 WC 2024: टीम इंडिया शनिवारी T20 वर्ल्डकपसाठी रवाना झाली. यावेळी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसह अनेक महत्त्वाचे खेळाडू अमेरिकेला गेले आहेत.

| May 26, 2024, 09:48 AM IST
1/7

टीम इंडिया शनिवारी अमेरिकेला रवाना झाली खरी मात्र यावेळी विराट कोहली टीम इंडियासोबत दिसला नाही. याबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते.

2/7

यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, विकेटकीपर ऋषभ पंत, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे खेळाडू रवाना झाले आहेत.  

3/7

याशिवाय कोचिंग स्टाफच्या सदस्यांमध्ये राहुल द्रविड आणि विक्रम राठोडही होते. मात्र, विराट कोहली टीमसोबत दिसला नाही.

4/7

मिळालेल्या माहितीनुसार, विराटचं पेपर वर्क पेंडिंग असल्याने तो टीमसोबत जाऊ शकला नाही. 

5/7

येत्या 30 मे रोजी विराट अमेरिकेला रवाना होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

6/7

टीम इंडियाचा उप-कर्णधार हार्दिक पांड्याही टीससोबत रवाना झाला नाही. हार्दिकंही टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीसह जाणार असल्याची चर्चा होती. 

7/7

दरम्यान हार्दिक आणि नताशा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातंय. कदाचित याच कारणाने हार्दिक टीम इंडियासोबत दिसला नाही.