Shubman Gill : फक्त 100 रुपयांच्या पैजमुळे शुभमन गिल बनला क्रिकेटर, पाहा नेमकं काय घडलं

Shubman Gill : भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलची मुख्य भूमिका बजावली. त्याने नाबाद 126 धावांची खेळी केली. शुभमनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण फक्त 100 रुपयांची पैज लावली गेली आणि त्यानंतर गिल हा क्रिकेटपटू ठरल्याचे आता समोर आले आहे. ही 100 रुपयांची पैज नेमकी कोणी लावली होती आणि त्यामुळे गिल हा कसा काय क्रिकेटपटू बनू शकला, जाणून घ्या.... 

Feb 02, 2023, 15:06 PM IST
1/5

शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने हे शतक 54 चेंडूत केले. शुभमनने 63 चेंडूंत 12 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद 126 धावा केल्या.   

2/5

शुभमन गिल हा सर्वात युवा द्विशतकवीर ठरला आहे. पण फक्त 100 रुपयांची पैज लावली आणि त्यामुळे गिल हा क्रिकेटपटू बनल्याचे आता समोर आले आहे.   

3/5

गिलने वयाच्या ४ वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. गिलच्या वडिलांना क्रिकेटची आवड होती. त्यामुळे त्यांनी शेतीचे रुपांतर क्रिकेटच्या मैदानात केले. आपल्या मुलासाठी त्यांनी खास हे मैदान बनवले होते. 

4/5

गिल हा एक चांगला फलंदाज व्हावा, यासाठी त्याच्या वडिलांनी एक प्लॅन बनवला. गिलच्या वडिलांनी सर्व मुलांना सांगितले की, जो शुभमनला बाद करेल त्याला 100 रुपयांचे बक्षिस मिळेल. ही गोष्ट जेव्हा शुभमनला समजली तेव्हा तो त्वेषाने पेटून उठला आणि आपली विकेट कोणालाच द्यायची नाही, ही गोष्ट त्याने ठरवली. त्यामुळे गिल हा तेव्हापासून आपली विकेट सांभाळून जपायला लागला.

5/5

त्यामुळे ही 100 रुपयांची पैज शुभमनच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरली. ही 100 रुपयांची पैज लागल्यापासून गिलतने कधीही आपली विकेट फेकली नाही. त्यामुळे ही 100 रुपयांची पैज शुभमनच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल घडवणारी ठरली. त्यामुळे ही 100 रुपयांची पैज शुभमन आयुष्यात कधीच विसरणार नाही.