तालिबानने बनवली Simurgh सुपरकार

 सुपरकार निर्मीतीच्या मार्केटमध्ये तालिबानच्या ऑटोमोबाईल कंपनीने एन्ट्री घेतली आहे.  या कारचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

Oct 09, 2023, 20:11 PM IST

Simurgh : सध्या सुपरकार्सचा ट्रेंड वाढत आहे. मात्र, जागातील काही ठराविक कंपन्याच सुपरकारची निर्मीती करतात. आता या सुपरकार निर्मीतीच्या मार्केटमध्ये तालिबानच्या ऑटोमोबाईल कंपनीने एन्ट्री घेतली आहे.  Geneva Motor Show मध्ये तालिबानने बनवलेली Simurgh ही सुपरकार पहायला मिळाली.

1/7

दशक जुन्या टोयोटा कोरोलाचे चार सिलिंडर इंजिन वापरून  तालिबानने  Simurgh ही सुपरकार बनवली आहे.   

2/7

Geneva Motor Show मध्ये तालिबानने बनवलेल्या Simurgh सुपकारची झलक पहायला मिळाली. 

3/7

या कारचे फिचर्स जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, या कारमध्ये फ्रंट ग्रिल स्लीक LED हेडलॅम्प, शार्प फ्रंट स्प्लिटर, ब्लॅक एलॉय व्हील्स, फ्लेयर्ड फेंडर्ससह जहरदस्त लुक देण्यात आला आहे. 

4/7

इतर प्रोटोटाइप सुपरकारच्या तुलनेत Simurgh सुपरकार अधिक शक्तीशाली असल्याचा दावा Entop कंपनीने केला आहे.   

5/7

एन्टॉपने या सुपरकारसाठी टोयोटाकडून घेतलेल्या इंजिनमध्ये काही बदल केले आहेत. 

6/7

अफगाणिस्तानची कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Entop आणि अफगाणिस्तान टेक्निकल वोकेशनल इंस्टीट्यूट (ATVI) यांनी या कारची निर्मीती केली आहे.   

7/7

अफगाणिस्ताननधील तब्बल 30 ऑटोमोबाईल इंजिनियर्सनी एकत्र येवून या कारचे डिझाईन तयार केले आहे.