8 दिवसांत 1.23 कोटींची छप्पर कमाई; फुकट्या प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल

विना तिकीट प्रवास करणा-या फुकट्या फुकट्या प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल झाली आहे. फुकट्या प्रवाशांकडून करण्यात आलेल्या दंड वसुलीच्या माध्यमातू रेल्वेने 8 दिवसांत 1.23 कोटींची छप्पर कमाई केली आहे. तब्बल 200 टीसींच्या माध्यमातून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Oct 09, 2023, 19:03 PM IST

Western Railway : विना तिकीट प्रवास करणा-या फुकट्या फुकट्या प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल झाली आहे. फुकट्या प्रवाशांकडून करण्यात आलेल्या दंड वसुलीच्या माध्यमातू रेल्वेने 8 दिवसांत 1.23 कोटींची छप्पर कमाई केली आहे. तब्बल 200 टीसींच्या माध्यमातून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. 

1/7

पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी ‘मेरा तिकिट, मेरा इमान’ ही मोहीम सुरु केली आहे. 

2/7

या पुढे देखील फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई सुरुच राहणार असल्याचे  पश्चिम रेल्वेकजून स्पष्ट करण्यात आले. 

3/7

 पश्चिम रेल्वे मार्गावर मागील वर्षाच्या तुलनेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 9.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

4/7

200 टीसींच्या माध्यमातून ही मोहिम राबवण्यात आली. पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर, मुंबई सेंट्रल या मोठ्या स्थानकांसह उनगरीय रेल्वे स्थानकांवर देखील टीसींचे पथक तैनात होते. 

5/7

 विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशा फुकट्या प्रवाशांकडून 1.23 कोटींचा दंड वसुल करण्यात आला. 

6/7

या कारवाईदरम्यान 20 पेक्षा जास्त प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. 

7/7

30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान तिकीट तपासणी मोहिम राबवून फुकट्या प्रवाशांकाडून दंड वसुल करण्यात आला.