EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

'सा गे ग म प - लिटिल चॅम्प्स' माध्यमातून प्रकाशझोतात आली कार्तिकी 

| Jul 04, 2020, 15:33 PM IST

दक्षता ठसाळे-घोसाळकर, झी मीडिया, मुंबई : 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' विजेती  गायिका कार्तिकी गायकवाडचा नुकताच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला.  'सा रे ग म प - लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामुळे कार्तिकी गायकवाड प्रकाशझोतात आली. संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली कार्तिकी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. 

कार्तिकी गायकवाडचा काही दिवसांपूर्वीच पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. २६ जुलै रोजी कार्तिकी गायकवाडचा रोनित पिसेसोबत साखरपुडा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अगदी घरच्या घरी सर्व नियम पाळून होणार आहे. 

1/6

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

रोनित पिसे पुण्याचा राहणारा असून कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील हे कुटूंब आहे. रोनित पिसे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे.

2/6

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे. अद्याप लग्नाची तारीख ठरली नाही अशी माहिती स्वतः कार्तिकी गायकवाडने दिली आहे. 

3/6

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

यासंदर्भात कार्तिकीशी बातचित केली तर,'हे सगळं अचानक ठरलं. आमचं अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे,' असं सांगते. 

4/6

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

'संगीताचा वारसा मी पुढेही जपणार आहे. रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा देखील दिल्या आहेत,' असं देखील कार्तिक सांगते. 

5/6

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा

ही आनंदाची बातमी कार्तिकीने तिच्या 'सा रे ग म प' च्या सगळ्या गँगला सांगितली. त्या सगळ्यांनाच ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत आणि कार्तिकी गायकवाड हे 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' चे स्पर्धक. यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. 

6/6

असा होता कार्तिकीचा लॉकडाऊन काळ?

असा होता कार्तिकीचा लॉकडाऊन काळ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलंय. या काळात अनेकांची काम थांबली. मात्र कार्तिकी या लॉकडाऊनमध्ये देखील प्रचंड व्यस्त होतं. संगीत हे कार्तिकीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. 'सा रे ग म प' या कार्यक्रमाला २५ वर्षे झाली. त्या संदर्भातील खास कार्यक्रमाच्या शुटिंगमध्ये कार्तिकी व्यस्त होती. त्याचप्रमाणे झी टॉकिजवरील 'गजर किर्तनाचा' या कार्यक्रमात सुत्रसंचलन कार्तिकीच घरातून करत आहे. त्यामुळे हा लॉकडाऊनचा काळ कार्तिकीसाठी व्यस्त होता. याच दरम्यान तिच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय तिने घेतला आहे.