गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी माळला जात नाही तर यामागे आहे शास्त्रीय कारण

Gajra Tradition : केसांमधील गजरा कोणत्याही महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. गजराचा सुगंध कोणालाही आकर्षित करु शकतो. पण तुम्हाला माहितीय गजरा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर यामागे शास्त्रीय कारण आहे. 

| Nov 29, 2024, 15:50 PM IST
1/7

फुलांची राणी असलेल्या चमेलीपासून मोगरा, जुईपर्यंत गजरा केसात माळल्यास महिलांचं सौंदर्य खुलून दिसतं. हिंदू धर्मात गजराचे विशेष महत्त्व असून शुभ कार्यात गजऱ्याशिवाय विधी पूर्ण होत नसतात. 

2/7

भारतात महिला पूजा, शुभ कार्य आणि सणांमध्ये आवर्जून केसांत गजरा माळतात. आजकाल गजरा लावण्याची खूप फॅशन आली आहे. पण यामागे शास्त्रीय कारण आहे हे तुम्हाला माहितीय का? 

3/7

तुम्ही दक्षिण भारतातील महिलांना रोज गजरा माळताना पाहिलं असेल. अगदी शास्त्रज्ञ महिलादेखील कितीही मोठ्या पदावर असो त्या गजरा नक्की लावतात. 

4/7

गजराच्या सुवासाने महिलांचं मनाला शांती मिळते. अतितणावामुळे झोप येत नसेल तर गजऱ्यामुळे फायदा मिळतो. 

5/7

शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजरा फायदेशीर ठरतो.  केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो.

6/7

केसगळती, अवेळी केस पांढरे होणं अशा समस्यापासून गजरा लावल्याने मुक्तता मिळते. 

7/7

केसातल्या गजऱ्याच्या सुगंधामुळे महिलांना दिवसभर फ्रेश ठेवण्यास मदत मिळते. मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)