बस स्टॅण्डपासून ATM पर्यंत....बँकेपासून घर-दुकानात पाणीच पाणी! चिपळूणातील जलप्रलयाचे पाहा फोटो

कोकणात पावसाचा हाहाकार...चिपळूणवर आभाळ फाटलं, 2005 पेक्षाही भीषण पूरस्थिती दाखवणारे पाहा फोटो    

Jul 22, 2021, 20:49 PM IST

कोकणात पावसाचा हाहाकार सुरू आहे. संपूर्ण पाण्यात गेलेल्या चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल होणार असल्याची माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. लोकांना बाहेर काढण्याचं नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितंलं. 

1/6

चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषणपरिस्थिती उद्भवली आहे.   

2/6

रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे संपूर्ण चिपळूण शहर जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. 2005 पेक्षा मोठा पूर या भागात आला.

3/6

वशिष्ठी,शिव नदीला पूर आला. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. तब्बल पाच हजार लोकं पाण्यात अडकली आहेत.   

4/6

या लोकांना सुखरूप स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत.  

5/6

या लोकांना सुखरूप स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत.  

6/6

चिपळूण बहादुरशेख भागात मुसळधार पावसामुळे  पूरस्थिती निर्माण झाली. बहादुरशेख भागात पाच फुटापेक्षा जास्त पाणी आलं.शहरातील अनेक भागात पाणी भरले असून बाजार पेठ ,मच्छी मार्केट ,भाजी मार्केट या सर्वच ठिकाणी पुराचं पाणी शिरलं आहे.