Face Wash आणि Cleanser एकच कि वेगळेवेगळे ?

 त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण क्लींझर आणि फेसवॉशचा वापर करतो.फेसवॉश आणि क्लींझर हे दोन्ही प्रोडक्ट त्वचा स्वच्छ करण्याचे कार्य करतात. पण फेसवॉश एक फोमिंग क्लींझर आहे तर क्लिनिंग लोशन किंवा क्लींझिंग मिल्क नॉन-फोमिंग ब्युटी प्रोडक्ट आहे. याबद्दल सांगितले आहे. 

Dec 14, 2023, 17:47 PM IST

 त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण क्लींझर आणि फेसवॉशचा वापर करतो.फेसवॉश आणि क्लींझर हे दोन्ही प्रोडक्ट त्वचा स्वच्छ करण्याचे कार्य करतात. पण फेसवॉश एक फोमिंग क्लींझर आहे तर क्लिनिंग लोशन किंवा क्लींझिंग मिल्क नॉन-फोमिंग ब्युटी प्रोडक्ट आहे. याबद्दल सांगितले आहे. 

 

1/8

 चेहऱ्यावरची त्वचा ही शरीराच्या इतर भागातील त्वचेपेक्षा नाजूक असते.आपल्या त्वचेसाठी वेगवेगळ्या स्कीनकेअरची गरज असते. त्यासाठी अनेक जण वेगवेगळं रुटीन फॉलो करतात.

2/8

 आपण त्वचेच्या स्वच्छतेसाठी फेस वॉश किंवा क्लिन्झरचा वापर करत असतो. पण फेसवॉश आणि क्लिन्झरमध्ये नेमका काय फरक आहे? दोन्हीपैकी अधिक चांगलं काय ठरु शकतं? याबद्दल आपण जाणुन घेणार आहोत.

3/8

फेसवॉश

 फेसवॉश

 फेस वॉश हा चेहऱ्यावरील त्वचेतील घाण, तेल, मेकअप आणि अशुद्धता काढून टाकण्यासाठी वापरला जातो. तेलकट, कोरडी, संवेदनशील किंवा पुरळ प्रवण त्वचा यासारख्या वेगवेगळ्या त्वचेसाठी फेस वॉश ऊपयुक्त आहे. 

4/8

क्लिन्झर

 क्लिन्झर

 फेस वॉशपेक्षा क्लिन्झर हे वेगळं आहे. क्लिन्झर  क्रीम, लोशन, तेल किंवा मायसेलर वॉटरच्या स्वरुपात मिळतो. 

5/8

  क्लिन्झर त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकता नाही. हे चेहऱ्यावरील अशुद्धता काढून टाकण्यासाठी वापरतात. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग क्लीन्सर आहे तर मुरुम त्वचेसाठी नॉन-कॉमेडोजेनिक क्लिन्झर असे बरेचसे क्लिन्झर उपलब्ध असतात.

6/8

क्लिन्झर आणि फेसवॉश मधील फरक

क्लिन्झर आणि फेसवॉश मधील  फरक

   फेस वॉशने  साबणासारखा फेस  तयार होतो. त्यात मुरुमांसाठी सॅलिसिलिक ऍसिड किंवा एक्सफोलिएशनसाठी ग्लायकोलिक ऍसिडसारखे घटक असू शकतात.  

7/8

क्लिन्झर आणि फेसवॉश मधील  फरक

क्लिन्झर त्वचेला कोरडेपणा न आणता त्वचा स्वच्छ करतो.   क्लिन्झर हे विविध टेक्स्चरमध्ये येतात आणि मेकअप काढण्यासाठी किंवा डबल क्लिन्झिंग करण्याच्या रुटीनचा एक भाग म्हणून वापरला जाऊ शकतो.    

8/8

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)