रात्री उशी घेऊन झोपताय, मग सावधान; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

रात्री अनेकांना उशी घेऊन झोपायची सवय असते. उशीवर डोकं ठेवल्यावर शांत झोप लागत असली, तरी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.

Aug 06, 2024, 11:33 AM IST
1/8

तुम्ही जर उशी घेऊन झोपत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.  उशी घेऊन झोपणं किंवा खूप दिवस उशांची आभ्रे न बदलणं या चुका छोट्याशा असल्या तरी त्यांचा वाईट परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. 

2/8

रात्री झोपताना अनेकदा वाईट स्वप्नं पडतात, त्यामुळे याचा परिणाम तुमच्या दिवसभराच्या कामावर होतो. याचं कारण म्हणजे तुम्ही झोपत असलेला अस्वच्छ बिछाना.   

3/8

तज्ज्ञांच्या मते,  शक्यतो रात्री उशी घेऊन झोपू नये त्याचबरोबर तुमच्या बिछान्यावरील चादर दररोज बदलायला हवी. झोपताना बिछाना स्वच्छ असावा त्याने चांगली झोप लागते.   

4/8

तुम्ही जर उंच उशी घेऊन झोपत असाल तर ही सवय चुकीची आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उंच उशीमुळे मानेला त्रास होतो तसंच याचा परिणाम तुमच्या स्कीनवर देखील होतो. उंच उशीमुळे स्कीन ताणली जाते, त्यामुळे जास्त सुरकुत्या पडतात. 

5/8

तुम्ही जर उंच उशी घेऊन झोपत असाल तर ही सवय चुकीची आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उंच उशीमुळे मानेला त्रास होतो तसंच याचा परिणाम तुमच्या स्कीनवर देखील होतो. उंच उशीमुळे स्कीन ताणली जाते, त्यामुळे जास्त सुरकुत्या पडतात. 

6/8

मानेपासून पाठीपर्यंतच्या स्नायूंना उशीमुळे त्रास होतो. यामुळे स्पॉन्डिलोसिस होण्याचा धोका असतो. 

7/8

चुकीच्या पद्धातीने उशी वापरल्याने डोकेदुखी,मानदुखी आणि खांदेदुखीचा सतत त्रास होतो. जर तुमचे सतत मुड स्विंग्ज होत असतील तर याचं कारण उशी वापरणं देखील असू शकतं.    

8/8

शक्यतो, झोपताना उशी न वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण जर तुम्हाला उशी घेऊन झोपायची सवय असेल तर, तुम्ही मध्यम उंचीची उशी निवडा, असं सांगितलं जातं.