'स्लमडॉग मिलियनेअर', 'शका लका बूम बूम' मधील कलाकारावर लैंगिक शोषण-प्राणघातक हल्ल्याचा आरोप

Feb 26, 2021, 18:07 PM IST
1/5

ऑस्कर-विजेत्या 'स्लमडॉग मिलियनेअर' चित्रपटाचा भाग असणारा अभिनेता मधुर मित्तल याच्यावर लैंगिक अत्याचार व प्राणघातक हल्ल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच्यावर त्याच्या मैत्रिणीने आरोप केला आहे. 

2/5

वृत्तानुसार, 13 फेब्रुवारीला मधूरने आपल्या मैत्रिणीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिला बेदम मारहाण केली आणि अत्याचार केल्याचं पीडित तरुणीने मधुरविरोधात मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मधुरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

3/5

या प्रकरणात अद्याप मधुरच्या बाजूने काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या तो जयपूरमध्ये एका वेब सीरिजच्या शुटिंगमध्ये आहे. मधुर शेवटच्या वेळी 2017 मध्ये रवीना टंडन स्टारर फिल्म 'मेरे' मध्ये दिसला होता. बाल कलाकार म्हणून, मधूर टीव्हीचा लोकप्रिय शो 'शका लका बूम बूम', 'बूगी वूगी' मध्ये देखील दिसला होता. या व्यतिरिक्त 'स्लमडॉग मिलियनेअर' मधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्या चित्रपटात त्याने नायक जमाल मलिकचा मोठा भाऊ सलीम मलिकची भूमिका साकारली होती.

4/5

मारहाणीमुळे तरुणीचा चेहरा, मान यांना दुखापत झाली आहे, असे निरंजनी शेट्टी यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर आपल्याविरोधातील वृत्ताची बातमी ऐकताच तो वेडा झाला आणि 15 फेब्रुवारीला येथे आला. पण त्यावेळी ती स्वत: हजर होती. आणि त्यांनीच मधुरला तेथून दूर नेले.

5/5

पीडितेचे वकील निरंजनी शेट्टी म्हणाले की, तिचा क्लायंट आणि मधूर यांची भेट डिसेंबर 2020 मध्ये झाली होती. दारूच्या नशेत तो स्वत: ला आपल्या क्लायंटवर लादत होता. मारहाणीच्या 2 दिवस अगोदर 11 फेब्रुवारी रोजी तिने मधुरशीचे सर्व संबंध तोडले असल्याचे पीडित तरुणीने सांगितले. पण १३ फेब्रुवारी रोजी मधुर मित्तल याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि सुमारे पंधरा वेळा तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला चापट मारली, केस खेचले, कान खेचले आणि मारहाण केली.