ही आहे जगातील सर्वात लहान नदी; कुठून सुरू होते, कुठे हरवते माहितीये?

जगातला सर्वात लहान समुद्र म्हणून इस्त्रायलच्या मृत समुद्राला ओळखलं जातं. मात्र जगातील सर्वात लहान  नदी तुम्हाला माहितीये का ?   

Apr 02, 2024, 15:13 PM IST

निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला अनेकांनाच आवडतं. समुद्र ,जंगल, आणि डोंगरदऱ्या अशा अनेक ठिकाणी फिरण्यासाठी निसर्गप्रेमींची पसंती असते. असं म्हणतात की देवाची करणी आणि नारळात पाणी... अगदी तसंच काही निसर्गरम्य ठिकाणं आपल्याला अंचबित करतात. 

1/7

इस्त्रायलच्या मृत हा जगातील सर्वात लहान समुद्र असून त्यात माणसं तरंगतात. मात्र या जगात अशी एक नदी आहे जी सर्वात लहान नदी म्हणून ओळखली जाते. 

2/7

जिथं अफ्रिकेच्या जंगलातील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते तिथं जगातील सर्वात लहान नदी म्हणून रो नदीला ओळखलं जातं.   

3/7

अमेरिकेत उगम पावलेल्या नदीची नोंद गिनीज बुकमध्ये जागतील सर्वात लहान नदी म्हणून करण्यात आली आहे. 

4/7

ही नदी 61 मीटर लांबीची असून तिचं उगमस्थान अमेरिकेतील मोंटाना राज्यात आहे.

5/7

या नदीला भेट द्यायला जगातील कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. 

6/7

रो नदीच्या आसपासचा परिसर हा निसर्गसौंदर्याने वेढलेला आहे. पावसाळ्यात या नदीच्या आसपासचा परिसर मनाला भुरळ घालतो. 

7/7

डोंगर कपारीतून वाहत येणाऱ्या रो नदीचं वैशिष्ट्यं हा अनेक निसर्गप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.