6GB रॅम, 50MP कॅमेरा अन् 2 वर्षांची वॉरंटी... Samsung च्या जबरदस्त फोनची बाजारात एन्ट्री

Samsung Galaxy A54 : सॅमसंगने गुरुवारी त्यांचे दोन नवीन मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात आणून सर्वांनाच धक्का दिलाय. सॅमसंगचे Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G हे दोन फोन भारतात लॉन्च झाले आहेत. सॅमसंगने नाइटोग्राफी फीचरसह हे फोन लाँच केले आहेत.

Mar 17, 2023, 13:25 PM IST

सॅमसंगने दोन्ही स्मार्टफोन्स सुपर AMOLED डिस्प्ले आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच OIS कॅमेरा सपोर्टसह लॉंच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि डिस्प्लेसह 5,000mAh बॅटरीसाठी सपोर्ट मिळतो. त्यामुळे जाणून घेऊया Galaxy A54 5G च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल....

1/6

Samsung Galaxy A54 model

Samsung Galaxy A54 5G हा Awesome Violet आणि Awesome Graphite या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

2/6

Galaxy A54 price

Galaxy A54 मध्ये स्टोरेजचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. 8GB + 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत  38,999 रुपये आणि 8GB + 256 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 40,999 रुपये आहे. 3,000 रुपयांपर्यंतचा बँक कॅशबॅक आणि Rs 2,500 सॅमसंग अपग्रेड ऑफर दोन्ही फोनवर उपलब्ध आहेत.  

3/6

Samsung Galaxy A54 battery life

Samsung Galaxy A54 मध्ये चार्जिंगसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली होते. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. 

4/6

Galaxy A54 charger

मात्र या फोनसोबत तुम्हाला चार्जर मिळणार नाही. लहान डिस्प्ले आणि जबरदस्त प्रोसेसरमुळे, Galaxy A54 ला Galaxy A53 पेक्षा जास्त बॅटरी लाईफ मिळते.

5/6

Samsung Galaxy A54 display

Samsung Galaxy A54 मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Android 13 आधारित One UI 5.1 फोनसोबत उपलब्ध आहे. डिस्प्लेसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सपोर्ट आहे. (फोटो सौजन्य -  Onleaks/91Mobiles)

6/6

Galaxy A54 camera features

Samsung Galaxy A54 5G ट्रिपल रिअर कॅमेरासह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंन्ट कॅमेरा आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 5-मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य -  Onleaks/91Mobiles)