मोबाईल घ्यायचाय? या महिन्यात लॉन्च होणार 10 स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व

मोबाईल खरेदी करायचा असेल तर ऑगस्ट महिना बेस्ट ठरणार आहे. कारण, या महिन्यात 10 स्मार्टफोन लाँच होणार असल्याने मोबाईल खरेदीसाठी अनेक ऑप्शन मिळणार आहेत. 

Aug 02, 2023, 20:44 PM IST

Smartphones will Launch in August : सध्या स्मार्टफोनचे मार्केट हे जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये आहे. अनेक कंपन्या इंडियन मार्केटमध्ये आपले स्मार्टफोन लाँच करत आहेत.  ऑगस्ट महिन्यात  तब्बल 10 स्मार्टफोन लाँच होणार आहेत. OnePlus, Samsung, Xiaomi सह अनेक लोकप्रिय ब्रँडचे हे मोबाईल असणार आहेत. 

1/11

Vivo V29 Series

Vivo V29 Series  ऑगस्ट महिन्यात लाँच होणार आहे. Vivo V29 आणि Vivo V29 Pro हे फोन लाँच केले जाणार आहेत. 

2/11

Tecno Pova 5 Pro

Tecno Pova 5 Pro हा फोन कधी लाँच होणार याची तारीख जाहीर झाली नसली तरी याच महिन्यात हा फोन लाँच होणार आहे. 

3/11

Samsung Galaxy F34 5G

Samsung Galaxy F34 5G  हा फोन 7 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. हा बजेट फोन असून याची किंमत  16,000 रुपये असले. 

4/11

Redmi 12

Redmi 12 हा फोन 1 ऑगस्ट रोजी भारतात लाँच झाला आहे. Redmi 12 5G आणि Redmi 12 4G  असे हे फोन आहेत. 

5/11

Realme 11

Realme 11 4G आणि Realme 11 5G फोन याच महिन्यात भारतात लाँच होणार आहेत.

6/11

Poco M6 Series

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात POCO M6 Pro 5G लाँच होणार आहे. POCO M6 Pro 5G इतर POCO M6 सीरिजचे हे फोन असणार आहेत 

7/11

OnePlus Open Fold

OnePlus Open Fold हा वनप्लस कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात हा फोन लाँच होईल. हा फोन Samsung आणि Google सारख्या मोठ्या ब्रँडला टफ देणार आहे.  

8/11

Motorola Moto G14

Motorola Moto G14  हा फोन 1 ऑगस्ट रोजी लाँच झाला आहे. हा बजेट फोन आहे. 

9/11

iQOO Z7 Pro

iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होणार आहे. या फोनमध्ये पावरफुल प्रोसेसर असणार आहे. 

10/11

Infinix GT 10 Series

Infinix GT 10 Series हा फोन  3 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.  या फोनमध्ये 108MP कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8050 चिपसेट प्रोसेसर आहे. 

11/11