Rohit Sharma: ...तर मी वाईट कर्णधार होईन; रोहित शर्माच्या वक्तव्याने एकच खळबळ

वर्ल्डकपपूर्वी रोहितचं स्पर्धेतील कर्णधारपद आणि नेतृत्वशैलीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेरीस रोहितने प्रश्नांना चोख उत्तर दिले आहे. 

| Nov 02, 2023, 12:58 PM IST
1/6

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करतेय.   

2/6

वर्ल्डकपपूर्वी रोहितचं स्पर्धेतील कर्णधारपद आणि नेतृत्वशैलीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेरीस रोहितने प्रश्नांना चोख उत्तर दिले आहे. 

3/6

2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माची कर्णधारपदाची कामगिरी उत्कृष्ट ठरलीये. 

4/6

वर्ल्डकपच्या सामन्यापूर्वी रोहित म्हणाला, तुम्हाला परिस्थिती समजते, स्कोअरबोर्ड पहा आणि योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. कधी कधी गोष्टी बरोबर होतात तर कधी नाही. आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असणे आवश्यक आहे. 

5/6

आम्ही जो काही निर्णय घेतो तो टीमच्या हिताचा आहे, हे मला माहीत असेल, तर ते ठीक आहे. पण एक खराब सामना आणि मी एक वाईट कर्णधार होईन, असं विधान रोहितने केलंय.

6/6

टीमच्या रणनितीवर प्रश्न विचारल्यावर रोहित म्हणाला, आम्ही काय करणार आहोत हे मला सांगायचे नाही. या ठिकाणी गोष्टींचा कधीही अंदाज येत नाही. गोलंदाजांनाही येथे फायदा होतो.