सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, फॉर्म घेण्यासाठी कामगारांच्या लांबच लांब रांगा

कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. 

May 02, 2020, 14:39 PM IST

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारत लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगार हे देशाच्या विविध राज्यांमध्ये अडकले आहेत. या परप्रांतीय कामगारांना आपल्या राज्यात जाण्यासाठी आता केंद्र सरकारने परवानगी दिली. महाराष्ट्र सरकारने या कामगारांना काही नियम व अटीवरतीच आपल्या राज्यात जाण्यास परवानगी दिली आहे.

1/6

त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव सणसवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये अडकलेल्या परप्रांतीय कामगारांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी एकच गर्दी केली आहे.   

2/6

फॉर्म घेण्यासाठी शिक्रापूर येथे परप्रांतीय कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींगचा ही फज्जा उडाला आहे.  

3/6

फॉर्म घेण्यासाठी कामगारांनी अर्धा किलोमीटर पर्यंत लांब रांगा लावल्या असून जमावबंदी चे नियम धाब्यावर बसवत कामगारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.   

4/6

आठवडाभरापूर्वी शिक्रापूर मध्ये एका चाळीस वर्षीय व्यक्तीला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता.  

5/6

त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी या परिसरात केलेली गर्दी पाहता कामगारांना कोरोनाचे गांभीर्य आहे की नाही हाच प्रश्‍न यानिमित्ताने समोर येताना दिसत आहे

6/6