वडिलांसोबत लग्नात स्टेज शो, मुंबईत आल्यावर ऑफिसमधून धक्के मारुन काढलं, क्षमता असूनही 5 वर्षे झगडत राहिल्यानंतर 'त्या' एका गाण्याने

Sonu Nigam Birthday : 30 जुलै 1973 रोजी फरीदाबादमध्ये जन्म झालेला हा चिमुकला आवाजाच्या जोरावर जगावर राज्य करतोय. यशस्वी गायक होण्याचा त्याचा प्रवास खूप कठीण होता. 

| Jul 30, 2024, 08:24 AM IST
1/7

गायक होण्यापूर्वी हा चिमुकला वडिलांसोबत लग्नसोहळ्यात स्टेज शो करायचा. त्यानंतर तो गायक होण्यासाठी मुंबईत आल्यावर त्याला ऑफिसमधून धक्के मारून काढण्यात आले. 

2/7

आम्ही बोलत आहोत सोनू निगम याच्याबद्दल. त्याला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, 'वडील स्टेजवर क्या हुआ तेरा वादा हे गाणं गात होते. तेव्हा सोनू रडायला लागला आणि मीही गाणार असा हट्ट केला. '

3/7

'वडिलांनी आईला डोळे दाखवून मला शांत करायला सांगितले. पण लोकांनी मी लहान आहे गाऊ द्या त्याला असा पाठिंबा दिला आणि मी स्टेजवर गेलो. त्यानंतर मी गाणं गायलं. ते सर्वांना खूप आवडलं.'

4/7

त्या घटनेनंतर मी प्रत्येक शोमध्ये वडिलांसोबत गायला लागलो. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी गायक होण्यासाठी मी मुंबईत आलो. पाच वर्ष त्याला संघर्ष करावा लागला. 

5/7

पण एकेदिवशी तिल्या पहिला ब्रेक मिळाला बॉर्डर चित्रपटात त्याला गाण्याची संधी मिळाली. संदेश आते है हे गाण गाजलं. आज 26 वर्षांनंतरही हे गाणं लोकांना ऐकायला आवडतं. त्यानंतर सोनूने कधी मागे वळून पाहिल नाही. आज तो बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाण्याचा बादशाहा आहे.

6/7

सोनू निगम आणि त्याची पत्नी मधुरिमा यांची लव्हस्टोरीही खूप सुंदर आहे. त्यांची भेट 1995 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. मधुरिमालाही गाण्याची आवड असल्याने त्यांची भेटीगाठी सुरु झाल्यात. सात वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. 

7/7

मीडिया रिपोर्टनुसार सोनू निगमची एकूण संपत्ती सुमारे $50 दशलक्ष असल्याच बोल जात. सोनू निगमची एकूण संपत्ती INR मध्ये सुमारे 370 ते 390 कोटी असून मासिक वेतन सुमारे 50 लाख रुपये आणि वार्षिक उत्पन्न सुमारे 6 ते 8 कोटींच्या घरात आहे.