Sooryavansham : 14 वर्षे बांधकाम, 35 खोल्या; ठाकूर भानुप्रताप सिंह यांची हवेली पाहिलीत का?

Jan 24, 2023, 19:31 PM IST
1/5

sooryavansham amitabh bachchan

या चित्रपटातील कलाकारांसोबत त्यातील काही ठिकाणंही खूप प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये ठाकूर भानूप्रताप राहत असलेली हवेलीसुद्धा प्रसिद्ध झाली होती.

2/5

sooryavansham palace

1999 मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा दुहेरी भूमिका असलेला सूर्यवंशम  चित्रपट गुजरातच्या बनारसकांठा येथे शूट करण्यात आला होता. यासाठी बलराम पॅलेसची निवड करण्यात आली होती आणि हा पॅलेस ठाकूर भानू प्रताप यांची हवेली बनली

3/5

gujarat balaram palace

चित्रपटाला 23 वर्षे झाली मात्र इतक्या वर्षांनंतरही हा पॅलेस जसाच्या तसा दिसतो. या हवेलीच्या बांधकामाला 100 वर्षे झाली आहेत. या हवेलीच्या ठिकाणी नवाब शिकारीसाठी येत असत. त्यानंतर तत्कालीन नवाब तल्ले मोहम्मद खान यांना ही जागा आवडल्याने येथे हवेली बांधली गेली.

4/5

balaram palace

हा महाल बांधण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागली. याचे बांधकाम 1922 मध्ये सुरू आणि ते 1936 पर्यंत सुरु होते. या पॅलेसचे मालक हर्षदभाई मेहता आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्याचे नूतनीकरण केले होते. त्यानंतर त्यांनी याचा हॉटेल बनवण्याचा निर्णय घेतला.

5/5

sooryavansham balaram palace

आता हा पॅलेस शूटिंग आणि चित्रपटांसाठीही भाड्याने दिला जातो. या पॅलेसमध्ये एकूण 34 खोल्या असलेल्या या पॅलेसमध्ये सूर्यवंशमचे शूटिंग महिनाभर चालले होते.