रिकी पाँटिंगनंतर कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच? सौरव गांगुलीने स्वत:च जाहीर केलं नाव

Delhi Capital New Head Coach: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्ससह आपला प्रवास संपवला. दिल्लीच्या एक्स हँडलवरून अधिकृतपणे याची पुष्टी करण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) 'रामराम' ठोकल्याने आता दिल्लीचा हेड कोच कोण असेल? यावर सौरव गांगुलीने (Sourav ganguly) मोठं वक्तव्य केलं आहे.

Saurabh Talekar | Jul 15, 2024, 11:40 AM IST
1/5

रिकी पाँटिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्ससह आपला प्रवास संपवला. दिल्लीच्या एक्स हँडलवरून अधिकृतपणे याची पुष्टी करण्यात आली.

2/5

सौरव गांगुली

रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच नसल्याने आता दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाला संधी मिळणार असा सवाल विचारला जातोय. त्यावर सौरव गांगुलीने उत्तर दिलंय.

3/5

आयपीएल 2025

मला आयपीएल 2025 साठी प्लॅन करायचाय. मला एकदा दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल जिंकायचं आहे. त्यामुळे आत्तापासून नियोजन करायला हवं, असं गांगुली म्हणतो.

4/5

मी मुख्य प्रशिक्षक

रिकी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणार नाही. त्यामुळे आता मला फ्रँचायझींशी बोलावे लागेल मी मुख्य प्रशिक्षक असेन, बघूया जमतंय का? असं गांगुलीने यावेळी म्हटलं आहे.

5/5

प्रवीण आमरे

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स फँचायझी आता काय निर्णय घेणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. तर सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे या पदावर कायम राहणार असल्याची माहिती देखील मिळतीये.