अबब! महिलेने तब्बल 10 मुलांना दिला जन्म, गिनीज बुकात रचला रेकॉर्ड

गेल्याच महिन्यात एका महिलेने 9 मुलांना दिला होता जन्म 

Jun 09, 2021, 13:05 PM IST

मुंबई : साऊथ आफ्रिकेतून एक अवाक करणारी घटना समोर आली आहे. जेथे एका महिलेने एकाचवेळी तब्बल 10 मुलांना जन्म देऊन नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. काही महिन्यापूर्वी एकाच गरोदरपणात सर्वाधिक मुलांना जन्म देऊन मोरक्कोमधील हलीमा सिसी नावाच्या महिलेने रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला होता. या महिलेने 9 मुलांना जन्म देऊन गिजीन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. मात्र एका महिन्यातच तिचा हा रेकॉर्ड मोडला आहे. 

1/5

डॉक्टरांनी 6 मुलं असल्याची शक्यता वर्तवली होती

डॉक्टरांनी 6 मुलं असल्याची शक्यता वर्तवली होती

मिळालेल्या माहितीनुसार, 7 जूनला 37 वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल नावाच्या महिलेने 10 मुलांना जन्म देण्याकरता ऑपरेशन केलं आहे. या महिलेने सात मुलांना आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. गरोदरपणाच्या तपासणीत डॉक्टरांनी तिला 6 मुल असण्याची शक्यता वर्तवली होती. 

2/5

नैसर्गिक पद्धतीने राहिली गर्भधारणा

नैसर्गिक पद्धतीने राहिली गर्भधारणा

आफ्रिकी मीडियाच्या माहितीनुसार, सिटहोलचे पतीने आठ मुलांची शक्यता वर्तवली होती. गरोदरपणात दोन मुलांबाबत काहीच माहिती मिळाली नाही. बहुतेक इतर दोन मुलं दुसऱ्या ट्यूबमध्ये असल्याची शक्यता वर्तवली होती. दाम्पत्य 10 मुलांच्या जन्माने अतिशय आनंदी आहे. कुटुंबात आनंदाच वातावरण आहे. 

3/5

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

एकाचवेळी 10 मुलांना जन्म देणं गोसियामी धमाराकरता सोपी गोष्ट नव्हती. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी अतिशय काळजी घेतली होती. सगळ्या मुलांना वाचवण्यात डॉक्टर यशस्वी ठरले. सिटहोलने मीडियाला सांगितलं की,'ती आपल्या या प्रेग्नेंसीमुळे खूप हैराण होती.'

4/5

मालीच्या महिलेच्या नावे रिकॉर्ड

मालीच्या महिलेच्या नावे रिकॉर्ड

 सिटहोलने दिलेल्या माहितीनुसार, ती अतिशय आजारी होती. तिच्यासाठी हे खूप कठीण होती. आताही हा सगळा प्रकार कठीण आहे. मात्र आता तिला याची सवय झाली आहे. सिटहोलने सांगितलं की, तिला त्रास होत नव्हता पण हे खूप कठीण होतं. मी फक्त देवाला प्रार्थना करू शकते.

5/5

काही महीने इन्क्यूबेटरमध्ये राहणार मुलं

काही महीने इन्क्यूबेटरमध्ये राहणार मुलं

मुलांच्या सुरक्षेसाठी इन्क्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.