पहिल्याच पावसानं झोडपलं; मुंबईची सद्य परिस्थिती दाखवणारे फोटो

पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा 

| Jun 09, 2021, 11:26 AM IST

मुंबई : मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आज मुसळधार पाऊस पडला आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच संततधार सुरु आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आपला इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे.

1/15

कुर्ला आणि सायन येथे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.   

2/15

दरम्यान, हार्बर, ट्रान्स हाबर आणि पश्चिम रेल्वे वाहतूक सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

3/15

कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

4/15

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस होत आहे किंग्ज सर्कल परिसरात  पाणी साचले आहे. 

5/15

मुंबईकरांचे सकाळपासूनच हाल होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सुनने मुंबईला झोडपले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. 

6/15

मुंबईकरांची पहिल्याच पावसात कसरत करावी लागत आहे. पहिल्याच पावसात मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे

7/15

. त्यामुळे लोकल धिम्या गतीनं सुरू तर संततधार पावसाचा वाहतुकीलाही फटका बसला आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

8/15

9/15

10/15

11/15

12/15

13/15

14/15

15/15