लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

Jul 07, 2019, 13:33 PM IST
1/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

कलाकार म्हटलं की त्यांच्या खासगी आयुष्याविषयी प्रचंड कुतूहल आलंच. पण, त्यासोबतच कुतूहल असतं ते म्हणजे खासगी आयुष्य आणि धकाधकीच्या या जीवनात, वेळापत्रकात ही मंडळी नेमका मेळ साधतात तरी कसा याविषयीचं. (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)

2/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे, दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या सोशल मीडिया पोस्टमधून. ज्यामध्ये त्याने त्याच्या वॅनिटी व्हॅनचे फोटो पोस्ट केले आहेत. (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)  

3/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

चित्रीकरणाचं व्यग्र वेळापत्रक आणि एकंदर जीनशैली पाहता चित्रीकरण आणि दौऱ्यांदरम्यानही काही निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी आणि सततच्या गर्दीपासून दूर येण्यासाठी म्हणून त्याने एक सुरेख आणि तितकाच भन्नाट मार्क निवडला आहे. हा मार्ग म्हणजे त्याच्या नव्या कोऱ्या वॅनिटी व्हॅनचा. (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)  

4/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्लू अर्जुनने त्याच्या नव्या कोऱ्या वॅनिटी व्हॅनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या जीवनात आलेल्या या वॅनिटीचा त्याला किती आनंद झाला आहे, याचा सहज अंदाज लावता येत आहे. (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)  

5/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

'आजवर आयुष्यात मी कोणतीही मोठी गोष्ट खरेदी केली त्यावेळी एकाच भावनेने मनात घर केलं होतं. ती भावना म्हणजे आजवर मला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. ज्याच्या बळावर मी अशा गोष्टी खरेदी करु शकत आहे....', असं कॅप्शन लिहित अल्लू अर्जुनने त्याच्या वॅनिटी व्हॅनचे फोटो पोस्ट केले. (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)  

6/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्याने वॅनिटी व्हॅन सर्वांच्याच भेटीला आणली. आपण या वॅनिटी व्हॅनचं नाव 'फाल्कन' असं ठेवल्याचंही त्याने स्पष्ट केलं.  (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)

7/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

रेड्डी कस्टम्स यांच्यातर्फे त्याची ही वॅनिटी व्हॅन साकारण्यात आली आहे.  (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)  

8/8

लाखात नव्हे, तर कोट्यवधींमध्ये एक अल्लू अर्जुनची वॅनिटी व्हॅन पाहिली?

अतिशय अद्ययावत अशा सुविधांनी परिपूर्ण अशा या वॅनिटी व्हॅनमध्ये प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीविषयीचे बारकावे टीपल्याची बाब लक्षात येत आहे. सर्वात महागडी वॅनिटी असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता अल्लू अर्जुनच्याही नावाचा समावेश झाला आहे.  (छाया सौजन्य- अल्लू अर्जुन/ इन्स्टाग्राम)