अंतराळातून थेट घरावर पडला कचरा; NASA वर ठोकला 80000 डॉलर्सचा दावा; काय असतं स्पेस डेब्रिज?

समनर कुटुंब हे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात राहते. त्यांच्या घरावर थेट अंतराळातून  700 ग्रॅम वजनाचा ढिगारा कोसळला आणि त्यांच्या घराचे छप्पर तुटले.

| Jun 23, 2024, 15:21 PM IST

Space Debris:समनर कुटुंब हे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात राहते. त्यांच्या घरावर थेट अंतराळातून  700 ग्रॅम वजनाचा ढिगारा कोसळला आणि त्यांच्या घराचे छप्पर तुटले.

1/12

अंतराळातून थेट घरावर पडला कचरा; इसमाने NASA वर ठोकला 80000 डॉलर्सचा दावा; काय असतं स्पेस डेब्रिज?

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

Nasa Space Debris:अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील एका कुटुंबाने अंतराळ संस्था नासा विरोधात $80,000 डॉलर्सचा दावा ठोकला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 66 लाख 85 हजार रुपये इतकी आहे. नासा ही संस्था अंतराळात संशोधनाचे काम करते. जे पृथ्वीपासून लाखो किमी अंतरावर आहे. मग तक्रारदार इसमाने नासावर गुन्हा दाखल  का केला? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

2/12

700 ग्रॅम वजनाचा ढिगारा

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

ही घटना 8 मार्च 2021 रोजी घडली होती. समनर कुटुंब हे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात राहते. त्यांच्या घरावर थेट अंतराळातून  700 ग्रॅम वजनाचा ढिगारा कोसळला आणि त्यांच्या घराचे छप्पर तुटले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिवारातून धक्क्यातून सावरत नव्हता. 

3/12

भरपाई नासाने करावी अशी मागणी

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

मलब्याचा तुकडा घरावर पडला तेव्हा त्यांचे क्लाइंट ओटेरोंचा मुलगा डॅनियल घरी होता. या घटनेत त्याला दुखापत झाली नसली तरी परिस्थिती आणखी बिघडू शकत होती. याची भरपाई नासाने करावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

4/12

योग्य ती भरपाई

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

लॉ फर्म क्रॅनफिल ही समनर कुटुंबाचा खटला लढत आहेत. क्लायंट अलेजांद्रो ओटेरो यांचे नेपल्स, फ्लोरिडा येथे घर आहे. ढिगारा पडल्याने छताला छिद्र पडले होते. या घटनेचा माझ्या क्लाइंटच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. या घटनेमुळे झालेल्या त्रासाबाबत योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी फर्मचे वकील मिका गुयेन वर्थी यांनी केली आहे.  

5/12

अशी परिस्थिती धोकादायक

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

या घटनेत कोणीही शारिरीकरित्या जखमी झाले नाही याबद्दल क्लाइंट आणि त्यांचा परिवार कृतज्ञ आहे. पण अशी परिस्थिती धोकादायक ठरू शकते. एखाद्याला गंभीर दुखापत झाली असती किंवा मृत्यूदेखील झाला असता, असे वकिलांनी सांगितले. 

6/12

वापरलेल्या बॅटरीच्या कार्गो पॅलेटचा भाग

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

नासानेदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.  हा मलबा वापरलेल्या बॅटरीच्या कार्गो पॅलेटचा भाग होता. जो 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून कचरा म्हणून सोडण्यात आला होता. वातावरणात प्रवेश केल्यानंतरही ते पूर्णपणे नष्ट झालेला नसल्याचे नासाने म्हटले आहे. 

7/12

स्पेस डेब्रिज म्हणजे काय?

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

अवकाशात निर्माण होणाऱ्या कचऱ्याला 'स्पेस डेब्रिज' किंवा 'ऑर्बिटल डेब्रिज' म्हणतात. हा असा कृत्रिम पदार्थ आहे जो उपयुक्त नसतो पण पृथ्वीभोवती सतत फिरत असतो. हा कचरा मानवाने अवकाशात पाठवलेल्या वस्तूंपासून बनतो. त्यात रॉकेटचे तुकडे, उपग्रहाचे तुकडे, अंतराळवीरांनी सोडलेल्या वस्तूंचा समावेश असतो.

8/12

जगभरातील देशांच्या स्पेस एक्टीव्हिटीत वाढ

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

गेल्या 60 वर्षांत जगभरातील देशांच्या स्पेस अॅक्टीव्हिटीत वाढ झाल्यामुळे अवकाशातील कचरा वाढत आहे. नासाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार पृथ्वीच्या कक्षेत सध्या 10 सेमीपेक्षा जास्त आकाराच्या 29 हजारहून अधिक वस्तू आहेत. 

9/12

दररोज किमान एक तुकडा पृथ्वीवर

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

नासाच्या अंदाजानुसार, दररोज किमान एक तुकडा पृथ्वीवर पोहोचतो. हा तुकडा एकतर पृथ्वीवर कुठेतरी पडतो किंवा वातावरणात पोहोचताच जळून जातो. बहुतेक अंतराळातील मलबा पाण्यात पडतो, कारण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71% भाग पाणी आहे.

10/12

नासाचे अंतराळ केंद्र स्कायलॅब समुद्रात

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

1979 मध्ये नासाचे अंतराळ केंद्र स्कायलॅब पृथ्वीवर पडले होते. पण ते समुद्रात पडले. या घटनेची बराच वेळ चर्चा झाली. या ढिगाऱ्याचे वजन 75 टन होते. तो जमिनीच्या कोणत्याही भागावर पडला असता तर मोठा विध्वंस होऊ शकला असता. स्कायलॅब अमेरिकेने 14 मे 1973 रोजी अवकाशात पाठवले होते.

11/12

सौर वादळामुळे त्याचे पॅनल्स जळाले

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

स्कायलॅब सुमारे पाच वर्षे व्यवस्थित कार्यरत राहिली. पण अवकाशातील सौर वादळामुळे त्याचे पॅनल्स जळून गेले आणि हळूहळू त्याचे इंजिनही काम करणे बंद झाले. यानंतर ते अवकाशातून पृथ्वीकडे जाऊ लागले. सुरुवातीला तो पृथ्वीवर कुठे पडणार हेही माहीत नव्हते. 

12/12

चिनी अंतराळ स्थानक तिआंगॉन्ग

Space Debris Falling On Home American family sues Nasa World Marathi News

एप्रिल 2018 मध्ये चिनी अंतराळ स्थानक तिआंगॉन्ग पृथ्वीवर धडकण्याची शक्यता होती. याबद्दल खूप चिंता व्यक्त केली गेली पण ते समुद्रात पडले आणि साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.