Stocks to Buy : हे 5 शेअर करतील मालामाल! 27 टक्क्यांपर्यंत रिटर्नची शक्यता

चांगल्या बिझनेस आउटलुकला पाहता ब्रोकरेज हाऊसेसने काही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये चालू किंमतींपेक्षा 27 टक्क्यांपर्यंतचा तगडा रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

Aug 02, 2022, 10:42 AM IST

Stocks to buy : शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उतारात अनेक स्टॉक गुंतवणूकीसाठी योग्य पातळीवर दिसत आहेत. चांगल्या बिझनेस आउटलुकला पाहता ब्रोकरेज हाऊसेसने काही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये चालू किंमतींपेक्षा 27 टक्क्यांपर्यंतचा तगडा रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

1/5

Exide Industries Ltd

ब्रोकरेज फर्म Sharekhan ने Exide Industries चे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याची प्रति शेअर टार्गेट प्राईज 183 रुपये इतकी आहे. 1 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 158 रुपये इतकी होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन प्रति शेअर 25 रुपयांना किंवा जवळपास 16 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.

2/5

Sundram Fasteners Limited

Sundram Fasteners या कंपनीचे शेअर विकत घेण्याचा सल्ला Sharekhan या ब्रोकरे फर्मने दिला आहे. याची प्रति शेअर टार्गेट प्राईज 1,030 रुपये इतकी आहे. 1 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 860 रुपये इतकी होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन प्रति शेअर 170 रुयये किंवा 20 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.

3/5

TTK Prestige Limited

Anandrathi  या ब्रोकरेज हाऊसने TTK Prestige या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची प्रति शेअर टार्गेट प्राईज 1137 रुपये आहे. 1 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 898 इतकी होती. यावरुन, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन हा शेअर 239 रुपयांना किंवा 27 टक्क्यांचा रिटर्न मिळेल.

4/5

GMM Pfaudler Ltd

GMM Pfaudler या कंपनीचे शेअर विकत घेण्याचा सल्ला Anandrathi या ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. याची प्रति शेअर टार्गेट प्राईज 1929 रुपये आहे. 1 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 1563 रुपये होती. या प्रकारे, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन प्रति शेअर 366 रुपयांना किंवा 23 टक्क्यांचा रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

5/5

Emami Ltd

Emami या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला Motilal Oswal ने दिला आहे. याची प्रति शेअर टार्गेट प्राईज 520 रुपये आहे. 1 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 444 रुपये इतकी होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन हा शेअर 76 रुपयांना किंवा जवळपास 17 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.  (Disclaimer : येथे गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही झी मीडियाची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.)