पाण्याची बॉटल विकणारी तरुणी देतेय अंबानी-टाटांना टक्कर, कोण आहे जयंती चौहान?

Bisleri: मोठ्या उद्योगपतींच्या व्यवसायाशीही स्पर्धा करण्याचे धाडस दाखवणारे नवे उद्योगपती पुढे येत आहेत. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये एका महिलेचे नावही जोडले गेले आहे. ही महिला आता अंबानी-अदानी सारख्या देशातील बड्या उद्योगपतींना टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहेत. जयंती चौहानबद्दल आपण जाणून घेऊया.

| Jul 19, 2023, 11:57 AM IST
1/7

पाण्याची बॉटल विकणारी तरुणी देतेय अंबनी-टाटांना टक्कर, कोण आहे जयंती चौहान?

Success Story Bisleri owner Jayanti Chouhan competition Ambani Tatas group

Bisleri: आतापर्यंत आपल्याला  भारतातील श्रीमंत उद्योगपतींची नावे विचारली तर आपण मुकेश अंबानी, टाटा, बिर्ला यांची नावे सांगत असू. पण आता या मोठ्या उद्योगपतींच्या व्यवसायाशीही स्पर्धा करण्याचे धाडस दाखवणारे नवे उद्योगपती पुढे येत आहेत. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये एका महिलेचे नावही जोडले गेले आहे. ही महिला आता अंबानी-अदानी सारख्या देशातील बड्या उद्योगपतींना टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहेत. जयंती चौहानबद्दल आपण जाणून घेऊया.

2/7

बिसलेरी

Success Story Bisleri owner Jayanti Chouhan competition Ambani Tatas group

जयंती चौहान या पाण्याची बाटली विकणारी कंपनी बिस्लेरी या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. कंपनीला पुढे नेण्यासाठी त्या सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. बिसलेरी कंपनीने नवीन उत्पादनेही लाँच केली आहेत. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनलने अलीकडे काही नवीन कार्बोनेटेड पेये बाजारात आणली आहेत. बिस्लेरी त्यांच्या बिस्लेरी लिमोनाटा ब्रँड अंतर्गत कार्बोनेटेड पेये विकते.

3/7

जयंती चौहान

Success Story Bisleri owner Jayanti Chouhan competition Ambani Tatas group

खरेतर, काही काळापूर्वी बिसलेरी इंटरनॅशनल टाटा समूहामार्फत विकत घेण्याचे ठरले होते. कारण जयंती चौहानचे वडील रमेश चौहान यांनी उत्तराधिकारी नसल्यामुळे आणि वृद्धापकाळामुळे कंपनी विकण्याचा निर्णय घेतला होता. 

4/7

बिस्लेरीची सूत्रे हाती

Success Story Bisleri owner Jayanti Chouhan competition Ambani Tatas group

त्यावेळी रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान कंपनीची सूत्रे हाती घ्यायला तयार नव्हती. मात्र, टाटासोबतचा करार अयशस्वी झाल्यानंतर जयंतीने आपला विचार बदलला आणि बिस्लेरीची सूत्रे हाती घेतली.

5/7

मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा

Success Story Bisleri owner Jayanti Chouhan competition Ambani Tatas group

त्याचवेळी, अलीकडेच मुकेश अंबानी यांनीही कोल्ड्रिंक क्षेत्रात प्रवेश केला असून कॅम्पा कोला या ब्रँड नावाने कोल्ड्रिंक बाजारात आणले आहे. यासाठी मुकेश अंबानी यांनी प्युअर ड्रिंक्स ग्रुप घेतला आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, बिसलरीचा कोल्ड ड्रिंक मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय मुकेश अंबानींच्या योजनेला थेट टक्कर देईल.

6/7

रतन टाटांसोबतही स्पर्धा

Success Story Bisleri owner Jayanti Chouhan competition Ambani Tatas group

याशिवाय, टाटा समूहाला आता बिस्लेरीशी स्पर्धा करण्यासाठी टाटा कॉपर+ आणि हिमालयन यासह स्वतःच्या मिनरल वॉटर ब्रँडवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागली आहे. 

7/7

एकमेव वारसदार

Success Story Bisleri owner Jayanti Chouhan competition Ambani Tatas group

दरम्यान 7000 कोटींच्या साम्राज्याची एकमेव वारसदार जयंती चौहान ही मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्या कंपनीशी टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.