Mother's Day 2023: आज जागतिक मातृ दिन; महागातली भेटवस्तू नको, पण आईसाठी 'इवलासा' प्रयत्न करा; तिलाही बरं वाटेल

Mother's Day 2023 : प्रत्येक दिवस हा आईचा असतो, पण 14 मे 2023 अख्खा जगात मदर्स डे साजरा करण्यात येणार आहे. तुम्ही त्या दिवशी आईसाठी काय खास करणार आहात?

May 14, 2023, 09:29 AM IST

Happy Mother's Day 2023 : कोठेही न मागता, 
                                               भरभरून मिळालेलं दान,
                                                         म्हणजे आई...

मुलांसाठी आई आणि मुलांभोवती आई आयुष्य असतं. सकाळी उठल्यावर पहिली हाक आईला मारतो आणि रात्री झोपीसुद्धा तिच्या कुशीत जातो. तिच्या भोवती आपल्याला सुरक्षित वाटतं. मुलं कितीही मोठं झालं तरी आईसाठी तो लहानच असतो. 

1/7

मुलांसाठी आई आणि मुलांभोवती आई आयुष्य असतं. सकाळी उठल्यावर पहिली हाक आईला मारतो आणि रात्री झोपीसुद्धा तिच्या कुशीत जातो. तिच्या भोवती आपल्याला सुरक्षित वाटतं. मुलं कितीही मोठं झालं तरी आईसाठी तो लहानच असतो. 

2/7

या दिवशी प्रत्येक जण आईसाठी खास काही तर करतं. आईला कधीही महागातली भेटवस्तू नको, पण आईसाठी या काही गोष्टी केल्यास तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगणात मावत नाही.

3/7

तुम्ही स्वावलंबी बना, ही आईची सर्वात मोठी इच्छा असते.  स्वत:ची छोट्या छोट्या करा आणि बघा आईला किती आनंद होतो ते. 

4/7

आईवर घरातील कामांसोबत आजकाल ऑफिसचं कामही असतं. त्यामुळे तिचा ताण कमी करण्यासाठी तिला घरातील कामांमध्ये मदत करा. अगदी बाजारातून काही आणून देणे असो किंवा कपड्यांची घडी घालणं असो. 

5/7

आपल्या प्रत्येकाला एक दिवस कामापासून शाळा कॉलेजपासून सुट्टी मिळते. पण आईला जरी ऑफिसला सुट्टी असली तरी घरकाम काही सुटत नाही. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी तिला घरकामातून सुट्टी द्या. 

6/7

ही गोष्ट प्रत्येक घरात होते आई अनेक वेळा मुलांना हाक मारते पण ते लगेचच कधी होकार देत नसतात. त्यामुळे मातृदिनी आईला वचन द्या तिच्या प्रत्येक हाकेला धावून जाणार. 

7/7

आई मुलांचं नातं खूप खास असतं. आईपासून कधीही काही लपवू नका. हे लक्षात ठेवा प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी उभी असते. त्यामुळे तिच्यापासून काही लपवू नका.