'डर' नंतर शाहरुख आणि सनीमध्ये पडली फूट! पण 'गदर 2' नंतर एक कॉल आला आणि...

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला मिळालेलं यश हे अगणित आहे. सनी देओलचं नाव फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर लाखो प्रेक्षकांच्या तोंडात देखील आहे. सनी देओलनं साकारलेली तारा सिंग ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे. या सगळ्यात सनी देओलनं वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये बॉलिवूडची कोणीही न पाहिलेली बाजू आणि त्याचे इतर कलाकारांसोबत असलेलं नातं. त्यातही सावत्र बहीण ईशा देओलसोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. चला तर जाणून घेऊया सनी देओलनं केलेल्या काही वक्तव्यांविषयी...

| Sep 02, 2023, 18:54 PM IST
1/7

'गदर' च्या यशानंतर मिळालं नाही काम

BBC युकेला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलनं खुलासा केला की 'गदर' ला मिळालेल्या यशानंतर त्याला काम मिळत नव्हतं असा खुलासा त्यानं केला. 

2/7

'गदर' नंतर करिअरमध्ये बदल कसा झाला?

सनी देओल म्हणाला की हिंदी चित्रपटसृष्टी ही बदलत बॉलिवूड होत होती. त्यावेळी कॉर्पोरेटनं सगळ्यांची जागा घेतली. त्यामुळे सगळ्यात बदल होऊ लागले होते. 

3/7

धर्मेंद्र यांचा किसिंग सीन

सनी देओलनं वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर वक्तव्य करत ते असे एकमेव कलाकार आहेत जे अशा प्रकारच्या गोष्टी सहजतेनं करू शकतात. तर सनी देओल स्वत: चित्रपट पाहत नाही. 

4/7

सावत्र बहीण ईशासोबतचं नातं

सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशानं 'गदर 2' चं स्क्रिनिंग केल्यानंतर वक्तव्य केलं की सगळा राग आणि त्रास हा गेला असून आता आनंदानं त्याची जागा घेतली आहे. 

5/7

शाहरुख खानसोबत 'या' कारमामुळे आला होता दुरावा

सनी देओल आणि शाहरुख खान हे दोगे 1993 साली प्रदर्शित झालेल्या डर या चित्रपटात दिसले होते. त्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असलेला शाहरुख सगळ्यांच्या पसंतीस उतरला आणि सनी नाही यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. 

6/7

शाहरुखनं घेतला पुढाकार

'गदर 2' पाहिल्यानंतर शाहरुखनं त्याला फोन करून त्याच्या अभिनयाची स्तुती केली. इतकंच नाही तर गौरी आणि आर्यन देखील त्याच्याशी बोलले असे सनी देओलनं एका मुलाखतीत सांगितलं.   

7/7

'गदर 2' आणि 'ओएमजी 2'

'गदर 2' आणि 'ओएमजी 2' एकाच दिवशी प्रदर्शित होण्यावर सनी देओल म्हणाला होता की त्याला कसलीच चिंता नाही. कारण आमिर खानचा 'लगान' प्रदर्शित झाला होता तेव्हाच त्याचा 'गदर' प्रदर्शित झाला होता. त्याला तेव्हा चिंता नव्हती ना आता आहे. (All Photo Credit : Social Media)