close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी

Feb 12, 2019, 10:12 AM IST
1/6

रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिचा विवाहसोहळा नुकताच चेन्नईमध्ये पार पडला. सोमवारी सकाळी पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची धूम दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळाली. अभिनेता आणि व्यावसायिक विशागन वनानगामुडी याच्यासोबत सौंदर्याने लग्नगाठ बांधली. पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर या समारंभाचे बरेच फोटो पाहायला मिळाले. (छाया सौजन्य - सौंदर्या रजनीकांत / ट्विटर)

2/6

रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी

खुद्द सौंदर्यानेही तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन आयुष्यातील या नव्या प्रवासाटी ग्वाही देत काही सुरेख फोटो पोस्ट केले. श्री. व सौ. असं लिहित तिने लग्नाच्या काही विधींचे फोटो पोस्ट केले. (छाया सौजन्य - सौंदर्या रजनीकांत / ट्विटर)

3/6

रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी

मित्रमंडळी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात थलैवा रजनीकांत स्वत: पाहुण्यांकडे जातीने लक्ष देत होते. (छाया सौजन्य - सौंदर्या रजनीकांत / ट्विटर)

4/6

रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी

सौंदर्या आणि विशागनच्या लग्नसोहळ्यापूर्वी धार्मिक पूजा, तसंत मेहंदी आणि संगीत सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. (छाया सौजन्य - सौंदर्या रजनीकांत / ट्विटर)

5/6

रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी

मुलगी सासरी जाणार म्हटल्यावर वडिल भावूक होतातच. अभिनेते रजनीकांतही यावेळी आपल्या लाडक्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव करत तिला भावी आयुष्यासाठी शुभाशिर्वाद देत होते.(छाया सौजन्य - सौंदर्या रजनीकांत / ट्विटर)

6/6

रजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी

(छाया सौजन्य - सौंदर्या रजनीकांत / ट्विटर)